Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : ‘विठ्ठल’चे १०७ दिवसांत आठ लाख टन ऊस गाळप

Sugarcane Season : तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात आतापर्यंत १०७ दिवसांमध्ये ८ लाख ५ हजार ८४५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

Team Agrowon

Pandharpur News : तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात आतापर्यंत १०७ दिवसांमध्ये ८ लाख ५ हजार ८४५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याचे आजपर्यंतच्या इतिहासात १०७ दिवसामध्ये आठ लाख गाळप होण्याची पहिलीच वेळ आहे.

बी हेवी मोलॅसेसमधील साखरेची घट गृहीत धरुन सरासरी १०.६३ टक्के उताऱ्याने आठ लाख ११ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे, अशी माहिती कारखान्याच्या चेअरमन अभिजित पाटील यांनी दिली. श्री. पाटील म्हणाले, एकूण ऊस गाळपापैकी ८० टक्के म्हणजे सहा लाख ३१ हजार ८५५ टन उसाचे गाळप हे कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आहे.

उर्वरित २० टक्के ऊस म्हणजे १ लाख ७४ हजार टन कार्यक्षेत्राबाहेरील गेल्यावर्षी ज्यांनी ऊस दिला होता, त्या शेतकऱ्याचा उसाचे गाळप केले आहे. श्री विठ्ठल कारखान्याने आत्तापर्यंत केलेल्या गाळपामुळे ऊस बिलापोटी २३३ कोटी व तोडणी वाहतुकीपोटी ७२ कोटी ५० लाख, अशी एकूण ३०० कोटींची उलाढाल झालेली आहे.

पंढरपूर तालुक्यात आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच उपपदार्थ निर्मितीमध्ये आसवानी प्रकल्पातून ३९ लाख ४० हजार ४४८ लिटरचे स्पिरीट उत्पादन झाले असून सहवीज निर्मिती प्रकल्पातून ११४ दिवसांमध्ये चार कोटी ९४ लाख ८६ हजार युनिटचे उत्पादन झाले असून कारखाना वापर सोडून दोन कोटी ८० लाख युनिट विक्री केली आहे.

१५ जानेवारीअखेर गळितास आलेल्या उसाचे अनुदानासह बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेले आहे. तसेच तोडणी वाहतूक बिलाचे पेमेंट ३१ जानेवारीअखेर बँकेत वर्ग केलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या उसास २ हजार ९५० रुपयांप्रमाणे ऊसदर दिला जाणार असून ज्या शेतकऱ्यांचा ऊस मार्च महिन्यात येईल, त्या शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांप्रमाणे दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

Solapur DCC Bank: ‘डीसीसी’ने ओलांडला दहा हजार कोटींचा टप्पा

Onion Harvesting: कांदा वाचवण्यासाठी शेतशिवारात लगबग

Dharashiv Agriculture Loss: ऐन सुगीत ‘पूर्वमोसमी’चे धुमशान

SCROLL FOR NEXT