Monsoon Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाचा साडेआठ हजार हेक्‍टरला फटका

Monsoon Update : रब्बी हंगामात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत उत्पादकतेवर परिणाम झाला.

Team Agrowon

Yavatmal News : मार्च व एप्रिल महिन्यांत पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याच्या परिणामी ८ हजार ६८२ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल जिल्हास्तरीय संयुक्‍त समितीने आयुक्‍तांकडे पाठविला आहे.

गेल्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने खंड दिला. त्यानंतरच्या काळात मात्र अतिवृष्टी व संततधार पाऊस कोसळला. त्याचा फटका खरिपातील पिकांना बसत उत्पादकता प्रभावीत झाली. त्यानंतर रब्बी हंगामात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत उत्पादकतेवर परिणाम झाला.

गेल्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने खंड दिला. त्यानंतरच्या काळात मात्र अतिवृष्टी व संततधार पाऊस कोसळला. त्याचा फटका खरिपातील पिकांना बसत उत्पादकता प्रभावीत झाली. त्यानंतर रब्बी हंगामात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत उत्पादकतेवर परिणाम झाला.

भाजीपाला, फळपिकांना देखील अवकाळी पावसाचा दणका बसला. जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या पावसामुळे सुमारे ८ हजार ६८२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे. एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या १४ हजार ३७३ असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हास्तरीय संयुक्‍त अहवालावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांची स्वाक्षरी आहे. प्रशासनाकडून विभागीय आयुक्‍तस्तरावर अहवाल पाठविण्यात आला असला तरी मदत कधी मिळणार, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरितच आहे.

पीकनिहाय नुकसान

शेतकरी संख्या बाधित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

कोरडवाहू ४१५५--१६२४.५०

बागायती ९८४०--६८२५.२५

बहूवार्षिक ३७८--२३२.२९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT