Egg Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Egg Rate : तापमानात वाढ होत असतानाही अंडी दर टिकून

Poultry Production : तापमानात वाढ होत असताना अंडी दर टिकून असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

AmaravatI News : तापमानात वाढ होत असताना अंडी दर टिकून असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे. दरवर्षी तापमानात वाढ होण्याच्या काळात अंड्यांच्या दरात घसरण होत ते चार रुपयांपर्यंत खाली जातात. सद्यःस्थितीत अंड्यांना प्रति नग पाच रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. यापूर्वी हे दर साडेपाच रुपयांपर्यंत होते, अशी माहिती लेअर पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी दिली.

नाशिकनंतर अमरावती जिल्ह्यात अंडी उत्पादनासाठी लेअर पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. राज्याचे एकूण अंडी उत्पादन ७० लाखांच्या घरात असताना मागणी मात्र रोजची दोन कोटी अंड्यांची असल्याचे नॅशनल एग्ज को-ऑडिनेशन कमिटीची आकडेवारी सांगते. उर्वरित अंड्यांची गरज ही इतर राज्यातून होणाऱ्या पुरवठ्याच्या भरवशावर भागविली जाते.

मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत असतानाही उन्हाळ्यात मात्र मागणी घटत असल्याने दरात घसरण होते. परिणामी, उत्पादकता खर्चाची देखील भरपाई होत नसल्याची स्थिती दरवर्षी निर्माण होते.

आता तापमानात वाढ होत असताना अंड्याचे दर बऱ्यापैकी टिकून आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत ५२० ते ५५० रुपये प्रति शेकडा असा दर अंड्यांना होता. या आठवड्यात हे दर ५०० रुपये प्रति शेकड्यावर पोहोचले आहेत. या कालावधीत अंड्यांच्या दरात घसरण होते, असा लेअर पोल्ट्रीधारकांचा अनुभव आहे. यंदा मात्र त्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

अंड्याचा उत्पादन खर्च साडेचार रुपये आहे. तापमानात वाढ होत असताना हे दर कमी होतात. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील होत नाही, अशी स्थिती राहते. आता पाच रुपये प्रति नग म्हणजेच शेकडा ५०० रुपये असा दर आहे. यापूर्वी हे दर ५५० रुपयांवर होते. तरीसुद्धा काहीअंशी दर समाधानकारक आहेत, असे म्हणावे लागेल. यापुढील परिस्थिती कशी राहील हे सांगता येणार नाही.
- रवींद्र मेटकर,पोल्ट्री फार्म, अंजनगावबारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT