World Soil Day 2022 Agrowon
ॲग्रो विशेष

World Soil Day : जमीन सुपीकता वाढीसाठी प्रयत्न गरजेचे

माणिक रासवे

Parbhani News : माती व पाणी यांचे शाश्वत व्यवस्थापन करून जमीन चोपन, क्षारयुक्त होण्याची प्रक्रिया थांबवावी लागेल. जमिनीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हवामान बदलांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जात असताना माती, पाणी या सजीवसृष्टीसाठी महत्त्वाच्या असलेल्या घटकांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्येष्ठ मृदा शास्त्रज्ञ तथा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल यांनी केले.

जागतिक मृदा दिनानिमित्त ‘अॅग्रोवन’शी बोलताना डॉ. सय्यद ईस्माईल म्हणाले, थायलंडचे राजे ‘भुमी बोल’ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २०२२ पासून जागतिक अन्न व कृषी संघटना (एफएओ) तर्फे ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो.

दरवर्षी वेगवेगळ्या थीमच्या व्दारे जनजागृती केली जाते. यावर्षीचे (२०२३) थीम ‘माती व पाणी : जीवनाचे स्त्रोत’ हे आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी करिता माती व पाणी हे मुख्य स्रोत आहेत. अन्नाची निर्मिती मातीच्या माध्यमातून होते. माती व पाणी यांचे सजीवांसाठी अनन्य साधारण महत्त्व आहे. परंतु जगभरात माती व पाण्याचे प्रदूषण होत आहे. या अनुषंगाने शेतकरी, विद्यार्थी व जनसामान्यांना माती व पाण्याचे महत्त्व कळावे.

या दोन घटकांचे संवर्धन व्हावे. त्यादृष्टीने जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. माती व पाणी हे अन्न निर्मिती तसेच जीवसृष्टीचे संवर्धन करण्यासाठी मुख्यस्त्रोत आहेत. या स्त्रोतांचे सुरक्षित हस्तांतरण पुढील पिढीला करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे. माती व पाणी हे पिकांच्या वाढीसाठी अन्नद्रव्य पुरविणारे स्रोत आहेत. निरोगी जमीन ही पाण्याचा नैसर्गिकरित्या शुद्धीकरण करून साठवण करते.

सुमारे ८० टक्के शेती ही कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेती केवळ जमिनीतील ओलाव्यावर अवलंबून आहे. ओलाव्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. जमिनीची धूप, ऱ्हास, पाण्याचा निचरा, पाण्याची उपलब्धता, अन्नद्रव्य संचय या जमिनीच्या प्रमुख समस्या आहेत. जमिनीचे आरोग्य व पाण्याचे नियोजन या बाबी एकमेकांशी सलग्न आहेत. शेतीमध्ये पाण्याचा सुयोग्य वापर व योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.

माती, पाणी संवर्धनासाठी उपाययोजना

- जमिनीचे आरोग्य, पाण्याचे व्यवस्थापन, पाण्याचा सुयोग्य वापर व पाण्याची गुणवत्ता ही महत्त्वाची मानके आहे.

- जमिनीतील सेंद्रीय पदार्थ हे पिकांना जमिनीतील पाण्याची उपलब्धता वाढविण्यास गरजेचे आहेत.

- माती व पाणी व्यवस्थापन हे बदलत्या हवामानाशी, दुष्काळाशी, वादळाशी सामना व इतर नैसर्गिक संकटांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतात.

- जमिनीतील जैवविविधता टिकविण्यासाठी, धूप रोखण्यासाठी जमिनीचे आरोग्य जपणे आवश्यक आहे.

- मानवी आरोग्य जपण्यासाठी रसायनांचा असंयुक्तिक व असमतोल वापर रोखला पाहिजे. यामध्ये कीटकनाशके, संप्रेरके, रासायनिक खते यांचा समावेश होतो.

- निरोगी जमीन, शुद्ध पाणी हे कर्बाचे वातावरणातील प्रमाण व हवामान बदलांचे परिणाम रोखण्यास मदत करतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT