Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone : ड्रोनद्वारे कार्यक्षमरीत्या कीटकनाशकांची फवारणी शक्य : कुलगुरू डॉ. मिश्रा

Vasantrao Naik Marathwada Agriculture University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान वापरासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करिता विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत.

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान वापरासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करिता विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. शेतीत ड्रोन वापराबाबत राष्ट्रीय स्तरावर प्रमाणित कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) निश्चित झाले आहेत.

ड्रोन सेंन्‍सर द्वारे पिकांतील कीड व रोगाचा प्रादुर्भाव ओळखून इच्छित ठिकाणी कमी वेळात, कार्यक्षमरीत्या कीटकनाशकांची फवारणी करणे शक्य होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे संपूर्ण मराठवाड्यात मंगळवारी (ता. २७) माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत मांडाखळी (ता. परभणी) येथे परभणी कृषी विज्ञान केंद्र व विस्‍तार शिक्षण संचालनालय यांच्‍या तर्फे शेतकरी मेळावा व ड्रोन प्रात्यक्षिक आयोजित करण्‍यात आले होते.

अध्‍यक्षस्‍थानी डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, सरपंच नागेश सिराळ, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, नाहेप प्रकल्‍प संशोधक डॉ. गोपाल शिंदे, श्रीधर पवार, प्रगतिशील शेतकरी रमेश राऊत, अर्चना सिराळ आदींसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ उपस्थित होते.

डॉ.मिश्रा म्हणाले, की कलम करण्यासाठी विद्यापीठातील ग्राफ्टींग रोबोटची सुविधा शेतकरी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. ग्रामीण युवकांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाविषयक कौशल्‍य विकास केल्‍यास मोठा रोजगार उपलब्‍ध होईल.

विद्यापीठ शेतकरी, महिला व युवकांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता प्रयत्‍नशील आहे. नवीन राष्‍ट्रीय शिक्षण धोरणात निरंतर शिक्षणाची संधी सर्वांना मिळणार आहे. यावर्षी विद्यापीठाने १२५० एकर पडीक जमीन विहितीखाली आणल्यामुळे विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट होण्‍यास मदत होणार आहे.

शेतकरी रमेश राऊत, महिला शेतकरी अर्जना सिराळ यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम अंतर्गत असलेल्‍या विद्यापीठ अंतर्गत मराठवाड्यातील कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदी ठिकाणीच्या शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना माहिती दिली. शेती विषयक तांत्रिक समस्यांचे निराकरण केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bacchu Kadu Karjmafi : ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय; मुख्यमंत्री आणि बच्चू कडू यांची बैठक संपली

Rain Crop Damage: मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा झोडपले

Crop Damage: हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर

Flower Market: फूल बाजारासाठी समितीत जागा द्या

Soil Health: अकोला जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य  

SCROLL FOR NEXT