Crop Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Management : केळी, हळदीत दर्जेदार उत्पादनासाठी व्यवस्थापन करावे

Banana Crop Management : केळी व हळदीमध्ये उत्पादकता वाढीसह दर्जेदार उत्पादनासाठी पाणी, खते कीड-रोगाचे काटेकोर व्यवस्थापन करायला हवे.

Team Agrowon

Hingoli News : केळी व हळदीमध्ये उत्पादकता वाढीसह दर्जेदार उत्पादनासाठी पाणी, खते कीड-रोगाचे काटेकोर व्यवस्थापन करायला हवे. या दोन नगदी पिकांतील निव्वळ नफा वाढविण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापनावर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातील विशेषज्ञ (उद्यानविद्या) अनिल ओळंबे यांनी केले.

‘अॅग्रोवन’ व डी. जी. अॅग्रोन्युट्रीयंट प्रा. लि. नाशिक यांच्यातर्फे गिरगाव (ता. वसमत) येथील केळी उत्पादक शिवदास उधाणे यांच्या शेतावर शुक्रवारी (ता. २४) सकाळी आयोजित केळी व हळद पीक व्यवस्थापन या विषयावरील अॅग्रोवन संवाद चर्चासत्रात ओळंबे बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी गंगाधर नादरे होते. ज्येष्ठ शेतकरी खंडोजी माळवटकर, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे, डी. जी. अॅग्रोन्युट्रीयंट प्रा. लि.चे विभागीय वितरण अधिकारी भूषण मलकापुरे, दयानंद मुधोळ, वरिष्ठ वितरण अधिकारी तुकाराम बेंडे, ओंकार रायवाडे, विजय धानोरकर, मनोज ठोंबळे, गजानन सवंडकर, संभाजी बेले, सेवानिवृत्त विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. केशवराव नादरे, मंडळ कृषी अधिकारी पी. के. माने, कृषी सहायक एल. बी. हळदेवार, अरुण नादरे, शंकर कऱ्हाळे, श्रीनिवास खंदारे, ‘अॅग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुरेश पाचकोर, ‘सकाळ अॅग्रोवन’चे वितरक प्रभाकर बारसे आदी उपस्थित होते.

ओळंबे म्हणाले, की केळी व हळद पिकांमध्ये एकात्मिक व्यवस्थापन केले पाहिजे. उत्पादकता वाढविण्याच्या प्रयत्नात गरज नसताना केला जाणारा निविष्ठांचा वापर टाळवा. कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार वेळापत्रकानुसार खतांच्या मात्रा दिल्या पाहिजेत. तर केळी व हळद पीक व्यवस्थापनातील बारकावे समजून घेतले तर उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.

अभ्यास करून शेती करावी लागेल. मलकापुरे म्हणाले, की केळी, हळद पीकांसाठी चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत केला तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढीस मदत होते. केळीमध्ये निरोगी बेणे निवड, ठिबक सिंचन, शिफारशीनुसार विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करावा.

भिसे म्हणाले, की मनरेगाअंतर्गत केळी लागवडीसाठी अनुदान आहे. डॉ. नादरे म्हणाले, की कुटुंबाच्या एकीचे बळ, शिफारशीनुसार खतांचा वापर करून शेती करावी. ‘अॅग्रोवन’चे जिल्हा बातमीदार माणिक रासवे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Sowing: पुणे विभागात गहू पेरणी ८२ टक्क्यांवर

FPO Success Story: शेतकरी हिताला प्राधान्य देत ‘श्रमविकास’ ची झेप

Farm Road Scheme: पाणंद, शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबवविणार

Drug case: अमलीपदार्थ कारखानाप्रकरणी उपमुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा घ्या : हर्षवर्धन सपकाळ

Khandesh Farmer Issue: ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीककर्ज वसुली

SCROLL FOR NEXT