Crop Pest Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Pest Management : योग्य व्यवस्थापनाने फळमाशीचा प्रादुर्भाव रोखणे शक्य

Crop Management : या वेळी त्यांनी फळमाशीच्या नियंत्रणासाठी घरच्या घरी कमी खर्चात फळमाशी सापळा तयार करण्याचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना करून दाखविले.

Team Agrowon

Solapur News : फळमाशीचा प्रादुर्भाव योग्य व्यवस्थापन केल्यास रोखता येतो. शेतकऱ्यांनी तांत्रिक बाबींचा अवलंब आणि योग्य व्यवस्थापन केल्यास फळ, भाजीपाल्यामध्ये मुख्य समस्या असणाऱ्या फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करता येतो, असे हैदराबादच्या राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्थेचे सहसंचालक डॉ. ए. मेरीडोसा यांनी येथे सांगितले.

राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र, सोलापूरच्या वतीने आयोजित जाणीव जागृती प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी फळमाशीच्या नियंत्रणासाठी घरच्या घरी कमी खर्चात फळमाशी सापळा तयार करण्याचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना करून दाखविले.

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे अध्यक्षस्थानी होते. अपेडाचे सहायक व्यवस्थापक पांडुरंग बामणे, प्रदीप गोंजारी, समाधान जवळगे या वेळी उपस्थित होते.डॉ. मेरीडोसा म्हणाले, की कोणत्याही किडरोगाविषयी आपण आधीच जागरूक राहिले पाहिजे,

त्याच्या उपायांच्या दृष्टीने योग्यवेळी साधून योग्य व्यवस्थापनाने त्यावर प्रतिबंध आवश्यक करता येतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात बोलताना अपेडाच्या निर्यात वृद्धीसंबंधी विविध योजनांची माहिती श्री. बामणे यांनी दिली.

डॉ. तांबडे यांनी सोलापूर जिल्ह्यातील फळबाग व भाजीपाल्याला निर्यातीसाठी उपलब्ध संधीबाबत शेतकऱ्यांनीऱ्यांना माहिती दिली. श्री. जवळगे यांनी फळमाशीचा जीवनक्रम तिचा प्रादुर्भाव व नियंत्रण या विषयी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

Peek Pahani : 'पीक पाहणी'बाबत सरकारचा मोठा निर्णय, पीक विमा मदतीचा अडथळा दूर

AI in Farming: शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : डॉ. पाटील

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT