Chana Pest Management : हरभरा पिकात घाटे अळी नियंत्रणासाठी प्रयत्न

Chana Pest Control : अकोला जिल्ह्यातील खामखेड (ता. पातूर) येथील योगेश काळे यांनी १० एकर क्षेत्रामध्ये हरभरा लागवड केली आहे. आता पीक फुलोऱ्यात असून दमदार वाढीच्या अवस्थेत आहे. मागील सहा वर्षांपासून योगेशराव रब्बीमध्ये हरभरा लागवड करीत आहेत.
Chana Farming
Chana FarmingAgrowon
Published on
Updated on

Chana Farming Management :

शेतकरी नियोजन : हरभरा

शेतकरी : योगेश दिलीप काळे

गाव : खामखेड, ता. पातूर, जि. अकोला

हरभरा क्षेत्र : १० एकर

अकोला जिल्ह्यातील खामखेड (ता. पातूर) येथील योगेश काळे यांनी १० एकर क्षेत्रामध्ये हरभरा लागवड केली आहे. आता पीक फुलोऱ्यात असून दमदार वाढीच्या अवस्थेत आहे. मागील सहा वर्षांपासून योगेशराव रब्बीमध्ये हरभरा लागवड करीत आहेत. यापूर्वी भुईमूग व इतर पिके घेतली जायची. पीक फेरपालटीवर त्यांचा विशेष भर असतो. आजवर हरभऱ्याचे एकरी आठ ते १० क्विंटल दरम्यान उत्पादन त्यांनी घेतले आहे.

Chana Farming
Chana Farming : अमरावतीत सर्वाधिक क्षेत्र हरभरा पिकाखाली

लागवड नियोजन

खरिपातील सोयाबीन काढणी झाल्यानंतर हरभरा लागवडीचे नियोजन होते. जमीन मध्यम, काळी कसदार प्रकारची आहे.

दहा एकरांत हरभरा लागवडीचे नियोजन होते. त्यानुसार जॅकी ९२१८ या हरभरा वाणाचे बियाणे उपलब्ध केले.

लागवडीपूर्वी रोटाव्हेटरद्वारे जमिनीची मशागत करून घेतली.

लागवडीपूर्वी हरभरा बियाणाची रासायनिक आणि जैविक घटकांची बीजप्रक्रिया केली.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस ट्रॅक्टरच्या साह्याने दोन रोपांत २२ इंच राखत पेरणी केली.

पेरणीसोबत नत्र, स्फुरद, पालाश यांची एकरी २५ किलो प्रमाणे मात्रा दिली.

पेरणीसाठी एकरी ३५ किलो बियाणे वापरले आहे.

सिंचनासाठी स्प्रिंकलर लावले आहेत.

Chana Farming
Chana Farming : मर रोग नियंत्रणासाठी प्रयत्न

यावर्षी हरभरा पिकात सुरुवातीच्या काळात मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणवला होता. त्यासाठी ट्रायकोडर्मा व इतर बुरशीनाशकांचा वापर करून नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र काही प्रमाणात या रोगामुळे रोपांचे नुकसान झाले.

पीक संरक्षणावर भर

या वर्षी थंडी, ढगाळ वातावरण, पाऊस, धुके असे सतत बदलते हवामान राहिले आहे. अशा हवामानामुळे पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव चांगलाच वाढतो. त्यामुळे पीक संरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागते. आत्तापर्यंत हरभरा पिकांवर एकूण तीनवेळा रासायनिक फवारण्या घेतल्या आहेत.

पीक व्यवस्थापन

हरभरा पिकात फुलोरावस्था सुरू आहे. त्यामुळे पीक कीड-रोगमुक्त ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणी करण्यावर भर दिला जाईल. अधिक फुले लागण्यासाठी तसेच फुलांचे गाठ्यात रूपांतर होत असल्यामुळे त्यानुसार घटकांची फवारणी केली जाईल.

नुकतेच मजुरांमार्फत खुरपणी करून तण काढले आहे. काढलेले सर्व तण शेताबाहेर काढले. त्यानंतर डवरणीचा एक फेर दिला. त्यानंतर लगेच तुषार संचाद्वारे सिंचन केले.

पीक घाटे अवस्थेत आल्यानंतर आणखी रासायनिक फवारणी घेण्याचे नियोजन आहे. घाटे अळीचा प्रादुर्भाव रासायनिक कीटकनाशक, निंबोळी अर्क, पक्षिथांबे उभारून व्यवस्थापनासाठी प्रयत्न केले जातील.

सुरुवातीच्या १ महिन्याने फवारणीद्वारे दोन वेळा १२ः६१ः० या खताची फवारणी घेतली. आगामी काळात आणखी एक फवारणी घेण्याचे नियोजित आहे. आगामी काळात पिकास खत देण्याची आवश्यकता भासणार नाही.

- योगेश काळे, ८४५९३३१०२६

(शब्दांकन : गोपाल हागे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com