Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Crop : ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकावर परिणाम

Agriculture Weather Update : ढगाळ वातावरण व सकाळी पडत असलेल्या दवबिंदूंचा हरभरा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Yavatmal News : ढगाळ वातावरण व सकाळी पडत असलेल्या दवबिंदूंचा हरभरा पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे किडीसाठी पोषक वातावरण असल्याने कीटकांचे प्रजनन वाढण्याचा धोका असून खरिपानंतर रब्बीतील पीकावरही संक्रांत येण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमी कालावधीत बदल होत आहे. अचानक तापमानात वाढ होत असून लगेच तापमान खाली जात आहे. यामुळे अशावेळी हरभरा पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढला आहे.

अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने खरिपातील सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले. जास्त पावसाने तूर जळाल्याने उत्पन्नात घट झाली आहे. अशातच आता गरम, थंडीमुळे पुन्हा हरभरा अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणाने किडीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या काळात किडीचे प्रजनन वाढण्याची शक्यता आहे.

परिणामी, हरभरा पिकांवर किडीच्या आक्रमणाचा धोका वाढला आहे. एकामागून एक येत असलेल्या संकटांमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बीतही शेतकऱ्यांपुढे पीक वाचविण्याची मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात कापूस, सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.

शेतकऱ्यांनी न घाबरता उपाययोजना करावी. सध्या ढगाळ वातावरण आहे. काही दिवस हे वातावरण राहणार आहे, असे असले तरी शेतकऱ्यांनी न घाबरता, किडी नष्ट करणारी कीटकनाशकांची फवारणी करावी. योग्य काळजी घेतल्यास शेतीवर आलेले संकट टाळता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा.
डॉ. प्रमोद यादगीरवार, शास्त्रज्ञ, विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain Damage: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत द्या

Crop Insurance: परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६ लाख ७ हजारांवर अर्ज

Aerogel: खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणारा एअरोजेल विकसित

Cotton Farming: जमिनीची ताकद वाढवून कापूस उत्पादनवाढ

Indian Language: भाषा मरता देशही मरतो...

SCROLL FOR NEXT