Rope Production Agrowon
ॲग्रो विशेष

Ecological Rope Production : केळीच्या खोडापासून पर्यावरणपूरक दोरी

Environmentally friendly Rope : चौलमधील पर्यावरणप्रेमी शैलेश राईलकर यांनी केळीच्या खोडापासून घरच्या घरी पर्यावरणपूरक ‘दोरी’ बनवली आहे.

Team Agrowon

अभय आपटे, रेवदंडा

Revdanda News : बांधकामाच्या ठिकाणी सुंभाची दोरी वापरली जायची, पण मागील काही वर्षात नायलॉनचा वापर वाढल्‍याने सुंभाचा वापर घटला आहे. चौलमधील पर्यावरणप्रेमी शैलेश राईलकर यांनी केळीच्या खोडापासून घरच्या घरी पर्यावरणपूरक ‘दोरी’ बनवली आहे.

केळीच्या खोडापासून सुंदर असे रेशमी धागे बनतात. यापासून अनेक कलात्मक वस्तूही बनवल्या जातात. कोकणात बहुतांश शेतकरी, बागायतदारांच्या परसबागेत दोन चार केळीची झाडे असतातच.

खोडापासून दोरी बनवायला कोणतीही यंत्रसामग्री लागत नाही, शिवाय तीन पर्यावरणपूरक असल्याने तिच्या वापराने निसर्गाला बाधाही पोहोचत नाही. जाड सुंभाप्रमाणे केळीच्या खोडापासून दोर बनवणे शक्य आहे. याचा उपयोग घरगुती वापरासाठी, शेतकरी गोणी बांधण्यासाठी, भारे बांधण्यासाठी करू शकतात.

केळीचे खोड कापून आतील पापुद्रे वेगळे केले जातात, त्यावर अवजड वस्तूंने दाब देऊन आतील रस काढला जातो. हा रस बागेतील झाडांच्या मुळाशी टाकल्‍यास वाढीस पोषक असतो. राईलकर यांनी केळीच्या पापुद्र्यामधील रस काढल्यावर राहिलेला पट्टा दोरीवर टांगून आठवडाभर वाळत टाकायच्या, नंतर सुकलेल्या पट्ट्यांची वेणी घालून सुंभासारखी दोरी तयार केली जाते. सध्या प्रायोगिक तत्‍वावर हा व्यवसाय सुरू आहे.

प्रायोगिक तत्त्वावर केळीच्या पानापासून दोरी तयार करण्यास सुरुवात केली आहे. या कुठेही वीज किंवा कुठल्याही यंत्राचा वापर केलेला नाही. मध्यम केळीच्या खोडापासून चार ते पाच फुटी दोरी तयार होते. विविध पालेभाज्यांच्या जुड्या, पडवळाच्या भाजीचे भारे, पेंढ्याचा छोटा भारा, भाज्यांच्या गोणीची तोंडे बांधण्यासाठी त्‍याचा वापर होतो. भविष्यात मोठ्या खोडापासून दहा फूट लांबीचा दोर बनवायचा मानस आहे. हा प्रयोग पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.
शैलेश राईलकर, बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT