Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crisis: पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील खरीप पिके अडचणीत

Farmer Issue: पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि हवेली, खेड पूर्व भागात पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडील बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर आणि हवेली, खेड पूर्व भागात पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून विहिरींनीही तळ गाठला आहे. जिरायती भागासह बागायती भागातील शेतकरीही आर्थिक विवंचनेत सापडला आहे.  

जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख सरासरी २ हजार २६३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत एक लाख ८५ हजार ३४८ हेक्टर म्हणजेच ९२ टक्के पेरणी झाली आहे. त्यातच जूनमध्ये सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी २५०.७ मिलिमीटर म्हणजेच १४२ टक्के पाऊस पडला. जुलैमध्ये सरासरीच्या ३०९.३ मिलिमीटरपैकी २३३.४ मिलिमीटर म्हणजेच ७५ टक्के पाऊस पडला.

मात्र, जो काही दोन महिन्यांत पाऊस पडला तो प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यात पडला असला तरी पूर्व भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे या भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तुरळक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी झाली केली आहे. त्यासाठी आर्थिक परिस्थिती नसताना उसनवारीने आणि कर्ज काढून दोन महिन्यांपासून तयारी केली आहे. परंतु ऐन पावसाळ्यात पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे.

त्यामुळे खरीप हंगामात पुरेशा प्रमाणात पेरणी न झाल्याने खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकरी चांगलेच चिंतेत सापडले आहेत.एक जून ते ५ ऑगस्ट या कालावधीत हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांमध्ये कमीअधिक स्वरूपात पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणीने सरासरी गाठली असली तरी १०० टक्के पेरणी झालेली नाही. त्यातच जुलै महिन्यात कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे पेरणीच्या क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही.

जी काही पेरणी झाली आहे, ती सुद्धा ज्या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे, अशा ठिकाणी पेरण्या झाल्याची स्थिती आहे. सध्या पिके उगवून वर आली असली तरी जवळपास सर्वच भागात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची अजूनही प्रतीक्षा लागून आहे. बारामतीच्या पश्चिम व पूर्व भागात अजूनही पाऊस नसल्याने पिके सुकत आहेत. हीच परिस्थिती इंदापूर, शिरूर, पुरंदर, दौंड भागांत आहे. त्यामुळे या भागात खरीप हंगाम अक्षरशः वाया गेल्याची स्थिती आहे. ज्या ठिकाणी पाणी आहे, तेथे शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा पिकांचे नियोजन केले आहे.  

आम्ही दरवर्षी पाऊस कमी पडत असल्याने सोयाबीन, मूग, उडीद, कांदा, ज्वारी अशी कमी पाण्यावरची पिके घेतो. यंदा मे, जूनमध्ये चांगला पाऊस पडला असल्याने धूळवाफेवर मुगाची व बाजरीची पेरणी केली होती. आता पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, जुलै व ऑगस्टमध्ये पुरेसा पाऊस नसल्याने जी उगवून आलेली पिके आहेत, तेथेही पिकांची वाढ खुंटल्यात जमा आहे.  
- भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, कर्डे, ता. शिरूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

Crop Insurance: चंद्रपुरात पीकविम्याला कमी प्रतिसाद

River Linking Project: सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध

Anjangaon Surji APMC: अंजनगावसूर्जी बाजार समिती सभापती, प्रभारी सचिवावर गुन्हा

SCROLL FOR NEXT