Papaya Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Papaya Cultivation : ‘अर्ली’ पपई लागवड खानदेशात पूर्ण

Papaya Production : खानदेशात आगाप किंवा अर्ली पपई लागवड पूर्ण होत आली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात आगाप किंवा अर्ली पपई लागवड पूर्ण होत आली आहे. उष्णता वाढताच किंवा कमाल तापमान ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानंतर नियमीत किंवा हंगामी लागवड सुरू होईल, त्याबाबतचे नियोजन अनेकांनी केले आहे.

१५ नंबर वाणाच्या पपईची लागवड खानदेशात जानेवारीत सुरू झाली. ७८६ पपई वाणाची लागवड अधिक उष्णतेत केली जाते. ही लागवड या महिन्यात सुरू होते. परंतु यंदा मार्चमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले नाही. सायंकाळी थंडी असते.

पहाटेपर्यंत गारठा असतो. दुपारी १२ ते चार यादरम्यान ऊन तापते. परंतु कमाल तापमान या वाणाच्या लागवडीसाठी योग्य नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून, ही लागवड सुरू झालेली नाही. परंतु पुढील आठवड्यात ही लागवडदेखील सुरू होईल, असे संकेत आहेत.

खानदेशात यंदा पपईची लागवड कमी होईल, असे दिसत आहे. कारण डिसेंबर व जानेवारीत पपई दर परवडले नाहीत. या काळात सरासरी अडीच रुपये प्रतिकिलोचा दर होता.

दरांसाठी शेतकऱ्यांनी पपईची काढणी बंद केली होती. धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा बाजार समितीने हस्तक्षेप करूनही तिढा मिटत नव्हता. शेतातच पपई पिकून खराब झाली. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. खरेदीदारांनी मनमानी केली. यात अनेकांनी पपई लागवड नव्या हंगामात कमी करण्याचे नियोजन केले आहे. तर काहींनी लागवड टाळण्याचा निर्णय घेतला आहे.

खानदेशात मागील हंगामात सुमारे सात हजार २०० हेक्टरवर पपई पीक होते. नंदुरबारात पाच हजार २५० हेक्टरवर पपई पीक होते. नंदुरबारातील एकट्या शहादा तालुक्यात चार हजार ८०० हेक्टरवर पपई होती. या भागात पपई पीक कमी दर व विषाणूंच्या समस्येने काढावे लागले. यामुळे नंदुरबारातील लागवडीत मोठी घट येईल, असे दिसत आहे.

नंदुरबारात कमी लागवड

आजघडीला खानदेशात सुमारे अडीच हजार हेक्टरवर पपईची लागवड झाली आहे. ही लागवड जळगाव व धुळे जिल्ह्यात अधिक आहे. या भागात १५ नंबर पपईस पसंती मिळाली आहे. नंदुरबारातील लागवडीने वेग घेतलेला नाही. परंतु या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवडीस वेग येईल, असे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mobile Slaughterhouses : अरुणाचल सरकार देणार मोबाइल स्लॉटर हाउसला प्रोत्साहन

Climate Change : हवामान बदलावर विचारमंथन करणारी ‘कॉप’

Jaggery Production Kolhapur : गुळाला भाव मिळतोय पण आवक घटली; गूळ उत्पादनावर विधानसभा निवडणुकीचा परिणाम

Pomegranate Farming : यंदा दोन्ही बहरांचे नियोजन करतोय!

Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणी

SCROLL FOR NEXT