Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उडीद, मुगाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

Kharif Season : यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे पेरण्यांना लवकर सुरुवात झाली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुग आणि उडदाचे क्षेत्र यावर्षी वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यामुळे पेरण्यांना लवकर सुरुवात झाली. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुग आणि उडदाचे क्षेत्र यावर्षी वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात मुगाची तीस हजार हेक्टरमध्ये तर उडदाचे ४२ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली.

कल्याण नगर जिल्ह्यामध्ये या वर्षी मे महिन्यातील पावसाने उच्चांक मोडला. नवनाथ पाऊस झाल्यामुळे शेती मशागतीची कामे यावर्षी साधारण १५ ते २० दिवस अगोदरच पूर्ण झाली आणि पेरण्याही पंधरा ते वीस दिवस आधी झाल्या. पाऊस लवकर पडला तर मूग, उडदाचे उद्याचे क्षेत्र वाढत असल्याचा आतापर्यंत अनुभव आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर आणि पारनेर तालुक्यात मुगाचे, तर जामखेड आणि कर्जत सह अन्य काही भागात उडदाचे क्षेत्र अधिक असते. यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठी झाली मुगाच्या पेरणीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत मुगाची तीस हजार हेक्टरवर, तर उडदाची बेचाळीस हजार पेरणी झाली आहे.

सर्वाधिक जामखेडला वीस हजार, तर कर्जतला १४००० हेक्टर वर उडीद पेरला आहे. पारनेरला वीस हजार हेक्टरवर अहिल्यानगर तालुक्याचा ६ हजार हेक्टरवर मूग पेरला आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात मात्र मूग आणि उडदाची पेरणी झालेली नाही.

काही ठिकाणी पेरण्या अजून सुरू आहेत आतापर्यंत साधारण ४० टक्के हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. काही दिवसापासून पावसाने उघड दिल्यामुळे पेरणीला अडथळे येत असले तरी यावर्षी मूग आणि उडदाचे क्षेत्र अधिक राहणार असल्याचे दिसून येत आहे.

उडदाची पेरणी (कंसात मुगाचे क्षेत्र) (हेक्टर)

अहिल्यानगर ः ५०३ (४५७८)

पारनेर ः १९१(१९७९५)

श्रीगोंदा ः २४१२ (७९५)

कर्जत ः १३५३५ (४९६)

जामखेडः १९३०९ (१२००)

शेवगाव ः १४७ (१४४)

पाथर्डी ः ५१९५ (१४५१)

नेवासा ः ६३८ (५२०)

राहुरी ः ० (१११)

कोपरगाव ः (११)

श्रीरामपूर ः (१८)

राहाता ः (३५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT