गाई, म्हशींचे इयर टॅगिंग शंभर टक्के पूर्ण agrowon
ॲग्रो विशेष

Ear Tagging Animal : गाई, म्हशींचे इयर टॅगिंग शंभर टक्के पूर्ण, शेतकऱ्यांनीच घेतला पुढाकार

Animal Department : कानाखाली गोचिड किंवा इतर कीटक बसू नयेत म्हणून वेळोवेळी कान आतून आणि बाहेरून स्वच्छ करण्याचे आवाहन त्यांनी केले.

sandeep Shirguppe

Ear Tagging Animal Kolhapur : राज्य सरकारने जनावरांची ओळख निर्माण करण्यासाठी इयर टॅगिंग करण्याचे बंधनकारक केले. ज्या जनावरांचे इअर टॅगींग होईल त्याच जनावरांना अनुदान देण्याच्या निर्णयाने कोल्हापूर जिल्ह्यातील विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनीही आपल्या जनावरांचे टॅगींग पूर्ण केले. यामुळे पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होऊन पशुधनातील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रणासाठी तसेच पशू व पशूजन्य उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होऊ लागले आहेत.

सध्या जिल्ह्यात गोकुळ दूध संघ, वारणा दूध संघ व शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचे इयर टॅगिंग केले जात आहे. यामुळे पशुप्रजननाबाबत नोंदी ठेवण्यास मदत होऊ लागली आहे. जनावर कधी व्यायले, गाभण झाले का, किती वेळा उलटले, उपचार केले का, माजावर किती दिवसाला येते या बाबींची नोंद केली जाते.

याबाबत पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सॅम लुद्रिक म्हणाले की, टॅगिंग केल्यानंतर जनावर चांगले दिसत नाही, त्यामुळे आपल्या जनावरास कमी किंमत मिळते, असा एक गैरसमज काही पशुपालकांच्या मनात आहे, परंतु टॅगिंग केलेल्या जनावरास कमी किंमत मिळत नाही. टॅगच्या खाली गोचिड, पिसवा व इतर कीटक बसतात, असे काही पशुपालकांना वाटते, परंतु कानाखाली गोचिड किंवा इतर कीटक बसू नयेत म्हणून वेळोवेळी कान आतून आणि बाहेरून स्वच्छ करण्याचे आवाहन त्यांनी केले.

‘जनावरांचे हेल्थ कार्डच इयर टॅगिंगमुळे होते आहे. त्यांचे लसीकरण झाले आहे का, पुढचे लसीकरण कधी आहे, किंवा जनावरांना कोणता आजार आहे?, याची माहिती यामुळे मिळते. यामुळे शेतकरी स्वतःहूनच जनावरांचे इयर टॅगिंग करून घेत आहेत.

जिल्‍ह्यातील पशुधन (अंदाजे)

गाई - २ लाख ४३ हजार

म्हशी - ६ लाख ९ हजार

एकूण दुभती जनावरे - ८ लाख ५ हजार

शेळ्या, मेंढ्या - २ लाख ४० हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Irrigation Advisory: पावसाच्या खंडातील आपत्कालीन उपाययोजना

Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला

Cow Dung Machine: गोवरी निर्मिती यंत्राच्या डिझाइनला पेटंट

Revenue Office Citizen Hours: महसूल अधिकाऱ्यांचा दुपारी ३ ते ५ वेळ नागरिकांसाठी राखीव

Agricultural Electricity Issue: विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

SCROLL FOR NEXT