ऑस्ट्रेलियाने भारतातून होणाऱ्या कोळंबी आयातीवरील बंदी उठवली देशातील कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा यामुळे अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होऊ शकते.Indian Prawn Export: ऑस्ट्रेलियाने भारतातून होणाऱ्या कोळंबी आयातीवरील बंदी उठवली आहे. यामुळे देशातील कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने ५० टक्के आयात शुल्क लागू केल्याने कोळंबी उत्पादकांना मोठा फटका बसला होता..ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन बाजारपेठ खुली झाली आहे. या देशाने २०२२ मध्ये ३८ हजार टन कोळंबी आयात केली होती. आता त्यांनी भारतातून होणाऱ्या कोळंबी आयातीवरील बंदी उठवली आहे. यामुळे अमेरिकेच्या आयात शुल्कामुळे झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होऊ शकते. या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांना व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया आणि चीनशी स्पर्धा करावी लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे..Prawns Conservation : कोळंबी संवर्धनातील व्यवस्थापनाचे तंत्र.या निर्णयाची माहिती आंध्र प्रदेश सरकारमधील मंत्री लोकेश नारा यांनी नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावदरम्यान दिली. ''ऑस्ट्रेलियाने व्हाईट स्पॉट व्हायरस आढळून आल्याचे सांगत सोलून न काढलेल्या कोळंबीवर निर्बंध लागू केले होते. भारतीय सीफूड निर्यातदारांसाठी दीर्घकाळ हा अडथळा राहिला. पण, आता भारतातून होणाऱ्या कोळंबीच्या आयातीला मंजुरी मिळाली आहे. हा मार्ग सुलभ करण्यासाठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन सरकारने केलेल्या कामाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. एकाच बाजारपेठेवर अधिक अवलंबून न राहता आपण नवीन बाजारपेठात पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे.'' असे लोकेश नारा यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे..भारतातून होणाऱ्या सर्व निर्यात कोळंबीची स्थानिक अधिकाऱ्यांकडून व्हाईट स्पॉट व्हायरसची चाचणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर, जेव्हा हा माल ऑस्ट्रेलियात पोहोचेल तेव्हा तो वेगळा ठेवून पुन्हा त्याची तपासला केली जाईल. जर चाचणीत काही आढळून आले नाही तर त्याला परवानगी मिळेल, असे ऑल इंडिया श्रिंप हॅचरी असोसिएशनचे म्हणणे आहे..तलावातील कोळंबी बिजाचे संवर्धन | Farm Pond Prawn seed stocking | ॲग्रोवन.ऑस्ट्रेलियाने यापूर्वी भारतातून येणाऱ्या कोळंबीवर बंदी घातली होती. कारण त्यात व्हाईट स्पॉट व्हायरस आढळून आला होता. या बंदीच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका, विशेषतः भारतातील सर्वात मोठे कोळंबी उत्पादक राज्य आंध्र प्रदेशातील निर्यातदारांना बसला. जे अमेरिकेतील बाजारपेठेवर अधिक अवलंबून होते. पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात शुल्क लागू केले. यामुळे भारतीय निर्यातदारांनी ऑस्ट्रेलियासोबत पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या. त्याला यश मिळाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.