E-Crop Survey Agrowon
ॲग्रो विशेष

E-Pik Pahani : ‘सर्व्हर डाउन’ मुळे ई-पीक पाहणीचा फज्जा ; नोंदीपासून हजारो शेतकरी वंचित

E-Crop Survey : ई पीक पाहणीचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक शेतकरी या नोंदींपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या असून या नोंदी ऑफलाइन कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. मात्र, अॅपद्वारे नोंदी करण्यासाठी अनेक ठिकाणी नेटवर्कचे अडथळे येत आहेत. त्यामुळे नोंदी होण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी या नोंदींपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या असून या नोंदी ऑफलाइन कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ई-पीक पाहणीची नोंद असताना नुकसान भरपाई अचूक व लवकर मिळण्यासाठी ही नोंद आवश्यक आहे. आत्तापर्यंत खरीप हंगाम २०२३ मध्ये आतापर्यंत २४ हजार ९२० खातेदारांनी २४ हजार ६२८ हेक्टर आर क्षेत्रावर मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणीच्या नोंदी केल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पीक पाहणीची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु सर्व्हर डाउनमुळे पीक नोंदणी होत नसल्याची स्थिती आहे.

पीक पेरणी अहवालाचा रिअल टाइम क्रॉप डाटा संकलित होण्यासाठी ई-पीक पाहणी महत्त्वाची आहे. माहिती संकलित करताना पारदर्शकता येते. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कृषी पत पुरवठा सुलभ होतो. पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होते. ॲपवर नोंद असल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे उर्वरित खातेदारांनी दिलेल्या मुदतीत मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करणे गरजेचे आहे.

‘‘मी सुरवातीच्या काळात ई-पीक पाहणीची नोंद केली होती. त्यामुळे फारशी अडचण आली नाही. आता शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याची चर्चा सुरू आहे.
- भाऊसाहेब पळसकर, प्रगतिशील शेतकरी, कर्डे, ता. शिरूर.
अनेक शेतकऱ्यांकडे अॅड्राईड मोबाईल नाही. ज्या शेतकऱ्याकडे अॅड्राईड मोबाईल आहे. त्याच्याकडील अॅपमध्ये अडचणी येत आहेत. अनेकवेळा सर्व्हर डाऊन असल्याने जवळपास ७०-८० टक्के लोकांनी पीक पाहणीची नोंद केलेली नाही. सरकारने नोंद कशी करावी, याचे महसूल अधिकाऱ्यांना व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यानंतर नोंदी करणे गरजेचे आहे.
- दादा पवार, प्रगतिशील शेतकरी, खोपी, भोर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT