E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : रब्बीतील १ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्राची ई पीक पाहणी

Rabi Season : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात डीजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपव्दारे पीक पाहणीस रविवार (ता. १ डिसेंबर) पासून सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात यावर्षीच्या (२०२४) रब्बी हंगामात ३ लाख ४ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅप (डीसीएस) द्वारे शुक्रवार (ता. ३) पर्यंत १ लाख ६३ हजार ५४५ हेक्टर क्षेत्राची पीक पाहणी करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात डीजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपव्दारे पीक पाहणीस रविवार (ता. १ डिसेंबर) पासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात एकूण पीक पाहणी करावयाच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची संख्या ७ लाख ४५ हजार ८०५ आहे.

त्यापैकी शेतकऱ्यांनी पीक पाहणी नोंदविलेल्या प्लॉटची संख्या १ लाख ७१ हजार २१७ आहे. पीक पाहणी केलेल्या क्षेत्राची संख्या १लाख ६३ हजार ३४९ हेक्टर आहे. त्यामध्ये १०३.१० हेक्टर चालू पड असून एकूण पीक पाहणी क्षेत्र १ लाख ६३ हजार ५४५ हेक्टर आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात शुक्रवार (ता. ३) पर्यंत परभणी जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ५१७ हेक्टर (११२.४५ टक्के) झाली आहे. पेरणी क्षेत्र आणि डीजीटल क्रॉप सर्वे मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी क्षेत्र यांच्या मोठा फरक आहे. संपूर्ण पेरणी क्षेत्राची ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज आहे.

परभणी जिल्हा डिसीएस पीक पाहणी स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका पीकपाहणी प्लॉट संख्या पीकपाहणी नोंद प्लॉट पीक पाहणी क्षेत्र

परभणी १३३९४८ ३४४२२ ३४६५४

जिंतूर ११९६११ ३६०१७ १६२५१

सेलू ७९५६२ १७०२६ १७३५०

मानवत ५१००७ १०९६५ १२७८०

पाथरी ५४७५३ ५४३८ ६३४७

सोनपेठ ४४०३२ १२२५४ १६५४

गंगाखेड १०५४२० १३५५९ १०८८९

पालम ७०६१० ७९८२ ५८६१

पूर्णा ८६८६२ १८७२१ १६०७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT