E Peek Pahani : भोरमध्ये रब्बी हंगामातील ई-पीकपाहणीला प्रारंभ

Rabi Season : निगुडघर मंडलातील शेतकऱ्याना रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीला सुरुवात झाली असून, ई-पीकपाहणी कशी करायची आणि त्याचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon
Published on
Updated on

Bhor News : निगुडघर मंडलातील शेतकऱ्याना रब्बी हंगामातील ई-पीक पाहणीला सुरुवात झाली असून, ई-पीकपाहणी कशी करायची आणि त्याचे फायदे याबाबत शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या मार्गदर्शनाखाली निगुडघर येथे प्रत्यक्ष बांधावर जाऊन मंडल अधिकारी रूपाली गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र बेंद्रे, अमिर शेख, विकास कारळे, महसूल साहायक नीलेश गायकवाड, बबन अंबिके, पांडुरंग किंद्रे ई-पीकपाहणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उपस्थित होते.

E Peek Pahani
E - Peek Pahani : ई - पीक पाहणी करूनही तलाठी प्रमाणपत्राची मागणी ; सोयाबीन अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची नवी अट

शासनाच्या रब्बी हंगाम २०२४ ई-पीकपाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे मोबाइल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्याचे काम मंडल अधिकारी, तलाठी व नेमून दिलेले सहायक यांच्या सहकार्याने सुरू असून यामध्ये मोबाइल ॲपद्वारे शेतकरी स्तर व सहायक स्तर अशी पिकांची नोंद करण्यात येणार आहे. शेतकरी स्तराचा कालावधी १ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ तर सहायक स्तर १६ जानेवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राहणार आहे. सात-बारावर रब्बी हंगामातील पिकांची ई-पीकपाहणी नुसार नोंदणी केली जाणार आहे.

यामध्ये शेतकरी स्तरावरून मोबाइल ॲपद्वार ई-पीकपाहणी नोंद करण्यात येईल व शेतकरी स्तरावरील कालावधी संपल्यानंतर सहायकांमार्फत उर्वरित शेतकऱ्यांची पीकपाहणी मोबाइल ॲपद्वारे नोंदवण्यात येईल. तसेच डिजिटल क्रॉप सर्व्हेमध्ये गटाच्या हद्दीवर आधारित रेखांश अक्षांश बंधनकारक करण्यात आले आहेत.

E Peek Pahani
E-Peek Pahani : डीसीएस मोबाईल ॲपद्वारे होणार ई-पीक पाहणी

म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार, सहायक निवडलेल्या गटात जाऊन पीकपाहणी करत नाहीत तोपर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीकपाहणी अपलोड करता येत नाही. रेखांश अक्षांश बंधनकारक असल्यामुळे गाव नकाशे अद्ययावत असल्याची खात्री भूमी अभिलेख कार्यालयामार्फत करून घेणे आवश्यक आहे.

सदर ई-पीकपाहणी केल्यामुळे आपणास पीकविमा, पीककर्ज, नैसर्गिक आपत्ती एमएसपीअंतर्गत पिकाची नोंद तसेच ॲग्रोस्टॅक अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेणे साठी फायद्याचे ठरणार आहे. तरी तालुक्यातील सर्व खातेदारांनी आपल्या शेतजमिनीची ई-पीकपाहणी करून सात-बारा आद्ययावत करून घेण्याचे आवाहन तहसीलदार राजेंद्र नजन यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com