E - pik Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E - Pik Pahani : टाकळी येेथे ई पीक नोंदणीचा सर्व्हर ठप्प

E crop registration : टाकळी हाजी, ता.२६ : टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हा बँके तसेच ८ विविध विकास सोसायट्यांमध्ये पीक कर्ज भरण्याची गर्दी होत आहे.

Team Agrowon

Pune News : टाकळी हाजी, ता.२६ : टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हा बँके तसेच ८ विविध विकास सोसायट्यांमध्ये पीक कर्ज भरण्याची गर्दी होत आहे. मार्च महिना संपत आल्याने बँकांमध्ये अतिरिक्त ताण येत आहे. सध्या ई पीक नोंदणी सर्व्हर आठवडाभरापासून ठप्प झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. यामुळे पीक कर्ज वाटपही रखडले आहे.
पीक कर्जाचे नवे-जुने करण्यासाठी शेतकऱ्यांची बँकामधे रांगा लागल्या आहेत.

काही शेतकऱ्यांचे अनेक खाती आहेत. ते एका खात्याचे पैसे भरून त्याचे वाटप करून पुन्हा दुसऱ्या खात्याचे पैसे भरून घेत असतात. त्यासाठी प्रत्येक वर्षी ई पीक पाहणी नोंद लावावी लागते. टाकळी भागात ऊस पिकाचे कर्ज वाटप मोठ्या प्रमाणात होते.
उसने पैसे घेऊन अनेकांनी बँक खात्यात भरले. मात्र त्यानंतर आवश्यक ई पीक पाहणी नोंद करून सातबारा सोसायटी किंवा बँकांकडे जमा करावा लागतो. मात्र, गेली आठवडा भर सर्व्हर डाऊन आहे. यामुळे पीक नोंदणी होत नाही. त्यामुळे दोन दिवसाच्या बोलीवर  उसने घेतलेले पैसे बँकेत अडकून पडले आहेत. व्याज सवलतीचा फायदा घेण्यासाठी पीक कर्ज ३१ मार्च पूर्वी भरणे आवश्यक असल्याचे बापूसाहेब गावडे विकास सोसायटीचे सचिव गणेश हिलाल यांनी सांगितले.

ई पीक पाहणी नोंदणी बंद असल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. योग्य वेळेत कर्ज भरले नाही तर अनेक शेतकरी व्याज माफीच्या सवलतीला मुकणार आहेत.
- सोनभाऊ मुसळे, अध्यक्ष, सोनभाऊ गावडे विकास सोसायटी, म्हसे बुद्रुक

ई पीक पाहणी सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या असून, वरिष्ठांना त्या कळविण्यात आल्या आहेत. लवकरच सर्व्हर पूर्ववत केला जाईल.
- एम. व्ही. बागले, मंडल अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Integrated Nutrient Management: जमीन आरोग्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन आवश्यक: डॉ. संग्राम काळे

Panchayat Raj Funding: जिल्हा परिषदेच्या पंचायत राज विभागाला निधीचा ‘बूस्ट’

Khandesh Crop Damage: खानदेशात जानेवारी, मार्च, एप्रिलमध्ये वादळात पिकांची हानी

Agriculture Challenges: शेतकऱ्यांसमोरील आव्हानाची लढाई एकजुटीतून लढावी लागणार: अजित नवले

Solapur Crop Insurance: पीक विम्याच्या लाभात ‘शेतकरी उपाशी, कंपन्या मात्र तुपाशी’

SCROLL FOR NEXT