Amit Shah Agrowon
ॲग्रो विशेष

E-Market Award : संगमनेर तालुका सहकारी दूध संघास ई-मार्केट पुरस्कार

Sangmner Cooperative Sangh : स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या दूध संघाची स्थापना केली. राज्यात हा दूध संघ आदर्श ठरला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : संगमनेर तालुक्यातील ग्रामिण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या ई-मार्केट पुरस्काराने गौरविण्यात आले.

गांधीनगर, गुजरात येथे नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने देण्यात येणारा हा पुरस्कार देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शहा यांचे हस्ते दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी स्वीकारला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष मिनेश शहा, राष्ट्रीय सहकारी डेअरी इंगेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगल जीत उपस्थित होते.

स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या दूध संघाची स्थापना केली. राज्यात हा दूध संघ आदर्श ठरला आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला अधिक स्थिरता निर्माण करण्यासाठी दूध संघाचे काम सुरू आहे.

संगमनेर तालुक्यासह इतर भागातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला जातो. ७ लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. सहकाराच्या माध्यमातून समृद्धी निर्माण करणाऱ्या संगमनेर दूध संघाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सलग दोन वर्षे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा. खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, इंद्रजित थोरात, बाबा ओहोळ, सुधाकर जोशी, डॉ. जयश्री थोरात आदींनी रणजितसिंह देशमुख यांचे स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जूनच्या आधीच होईल, कृषिमंत्री भरणेंची महत्त्वाची माहिती

Medical Assistance Fund: वैद्यकीय साह्यता निधीतून २० कोटींची मदत

Fertilizer Demand: खरिपासाठी १.७४ लाख टन खतांची गरज

Tiger Attack: पशुधन विकास अधिकाऱ्यांसह चौघांवर वाघाचा हल्ला

Jairam Ramesh: अमेरिका-इराण चर्चेत पाकिस्तान बनला शांतिदूत?; मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला धक्का, काँग्रेसची जोरदार टीका

SCROLL FOR NEXT