Kolhapur News : वारणानगर, जि. कोल्हापूर : तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघास सलग दुसऱ्यांदा नॅशनल को-ऑप. डेअरी फेडरेशन यांचा ई-मार्केट पोर्टलवरील दूध व दुग्धपदार्थाच्या देशातील सर्वाधिक विक्रीसाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले.
नॅशनल को-ऑप. डेअरी फेडरेशन यांच्याकडून देशातील दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम व पारदर्शक व्हावा याकरिता ई-मार्केट पोर्टल चालविले जाते. ई-मार्केट पोर्टलच्या माध्यमातून दूध व दूग्धपदार्थांची विविध पातळीवर खरेदी-विक्री करण्यात येते. नॅशनल को-ऑप.
डेअरी फेडरेशनमार्फत अहमदाबाद (गुजरात) येथे २०२२-२३ सालचा देशातील सर्वाधिक विक्रीसाठीचा पुरस्कार वारणा दूध संघास केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते व एनडीडीबी आनंदचे अध्यक्ष मीनेश शहा, नॅशनल को-ऑप डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगलजीत राय, कार्यकारी संचालक श्रीनिवास सज्जा, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ झाला.
वारणा दूध संघाच्या वतीने हा पुरस्कार संघाचे अकाउंटंट मॅनेजर सुधीर कामेरीकर व मार्केटिंग ऑफीसर आर. व्ही. देसाई यांनी स्वीकारला. अध्यक्ष आमदार विनय कोरे यांचे अध्यक्षतेखाली व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या कुशल व्यवस्थापनाखाली दूध संघाची यशस्वी घौडदौड चालू आहे.
भारतीय संरक्षण दलासही संघाची दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा केला जात आहे. नॅशनल को- ऑप. डेअरी फेडरेशनचा पुरस्कार उमेदीने काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे, असे संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी कार्यकारी संचालक मोहन येडूरकर, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले व विक्री विभागाच्या सर्व अभिनंदन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.