Milk Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Rate Issue : दूधदरप्रश्नी प्रांताधिकारी कार्यालयासमोर शेण ओतून संताप

Milk Protest : दुधाला ४० रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी कोतूळ (ता. अकोले) येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी (ता. २३) कोतूळ ते संगमनेर अशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

Team Agrowon

Nagar News : दुधाला ४० रुपये दर मिळावा यांसह विविध मागण्यांसाठी कोतूळ (ता. अकोले) येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मंगळवारी (ता. २३) कोतूळ ते संगमनेर अशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

त्यात कोतूळसह परिसरातील मिळून सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी संगमनेर येथे प्रांत अधिकारी कार्यालयासमोर शेण ओतून शासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

गाईच्या दुधाला ४० रुपये मिळावा, दुधाला एफआरपी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे, दूध भेसळ थांबावी, पशुखाद्यांचे दर कमी करावेत इत्यादी मागण्यांसाठी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतूळ येथे १८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे.

मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने मंगळवारी कोतूळ येथून संगमनेरपर्यंत ५५ किलोमीटर शेतकऱ्यांनी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली रॅली सव्वाचार वाजता प्रांत कार्यालयात पोहोचली. अकोले येथे रॅली थांबवून पोलिसांनी चर्चा करण्याचे आवाहन केले.

चर्चा झाली, मात्र त्यानंतर रॅली संगमनेरला आली. एकाचवेळी साडेतीनशेपेक्षा अधिक ट्रॅक्टर शहरात आल्याने वाहतूक कोंडी झाली. प्रातांधिकाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. उलट आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा दिला. दरम्यान, मोठ्या प्रमाणात शेतकरी रॅलीत सहभागी झाले होते. शेतकरी नागरिकांनी रॅलीचे जागोजागी स्वागत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Scheme : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या दोन योजनांचे करणार मूल्यमापन; योजना बंद होणार?

E-Peek Pahani : शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीची कसरत

Agrowon Podcast: हरभरा बाजारभाव स्थिर; वांगी व लसणाचे दर टिकून, हळदीची मागणी कायम तर उडदाचा भाव दबावात

Rabi Jowar: चांगले उत्पादन देणारे रब्बी ज्वारीचे चार वाण

Banana Cluster : ‘बनाना क्लस्टर’मध्ये गुंतवणुकीची संधी

SCROLL FOR NEXT