Milk Protest : अखिल भारतीय किसान सभा दूध उत्पादकांच्या मागे : डॉ. ढवळे

Dr. Ashok Dhavle : शरद पवार यांनी दूध प्रश्नावरील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दूध उत्पादकाच्या पाठीमागे किसान सभाही उभी राहील, असे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले
Milk
MilkAgrowon
Published on
Updated on

Nagar News : दूध उत्पादकांच्या प्रश्नांमध्ये आपण लक्ष घालावे. याबाबत विनंती करणारे निवेदन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने कोतूळ (ता. अकोले) येथे सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (शरद पवार गट)अध्यक्ष शरद पवार यांना शुक्रवारी (ता.१९) निवेदन दिले आहे. शरद पवार यांनी दूध प्रश्नावरील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दूध उत्पादकाच्या पाठीमागे किसान सभाही उभी राहील, असे किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले

Milk
Sharad Pawar on Milk Price : दूध उत्पादकांच्या प्रश्नामध्ये आता शरद पवार लक्ष घालणार

गाईच्या दुधाला ४० रुपये प्रति लिटर दर मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे. अकोले तालुक्यातील कोतूळ या ठिकाणी १४ दिवस शेतकरी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी (ता. १९) अकोले येथे अशोकराव भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी अकोल्यात शरद पवार आले असताना दूध उत्पादकांनी त्यांना निवेदन दोन उत्पादकांच्या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करू असे आश्वासन या वेळी शरद पवार यांनी आंदोलकांना दिले. किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे शेतकरी मेळाव्यासाठी उपस्थित होते.

Milk
Milk Powder Import : दूध भुकटी आयातीवरून संभ्रम

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मांडणी करत असताना दूध उत्पादकांच्या प्रश्नाबाबत त्यांनी सखोल विश्लेषण केले. दूध प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनास कुणाचा पाठिंबा आहे त्यांनी हात वर करावा असे आवाहन त्यांनी सभेस केले. त्यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांनी हात उंचावून या आंदोलनास पाठिंबा दिला. मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार नीलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह उपस्थित कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला.

आंदोलनाचे नेतृत्व करणारे सदाशिव साबळे, विनोद देशमुख, अभिजित सुरेश देशमुख, नामदेव साबळे, बाळासाहेब गीते, प्रकाश देशमुख, भाऊसाहेब देशमुख, अभिजित भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे, एकनाथ मेंगाळ उपस्थित होते. २२ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन दूध प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधणार असल्याचेही डॉ. ढवळे यांनी या वेळी जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com