Employment Guarantee Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Employment Guarantee Scheme : अवकाळीचा फटाका; शेतकऱ्यांची मदार आता ‘रोहयो’वर

Drought Crisis : दुष्काळामध्ये शेतकरी आणि शेतमजुरांना हात दिला तो रोजगार हमी योजनेने. मात्र, या योजनेवरही यंत्रांनी गंडांतर आणल्याने शेतमजुरांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Nagpur News : दुष्काळामध्ये शेतकरी आणि शेतमजुरांना हात दिला तो रोजगार हमी योजनेने. मात्र, या योजनेवरही यंत्रांनी गंडांतर आणल्याने शेतमजुरांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांत तीनदा अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. त्याला रोजगार हमी योजनेचा (रोहयो) आधार मिळेल, अशी आशा आहे.

ग्रामीण भागातील जनतेला जवळच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून अकुशल कामगारांना रोजगार पुरविण्यात येतो. सध्या रोहयोच्या कामगारांना योग्य ती मजुरी देण्यात येते. प्रत्येक कामगाराला किमान १०० दिवस काम उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कामाचे दिवस १५० पर्यंत वाढविण्यात आले आहे. मजुरांनी मागणी केल्यास सरकार संपूर्ण ३६५ दिवसही काम देण्यास तयार आहे. दुष्काळी भागातील नागरिकांना त्यामुळे लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. म्हणूनच रोहयोमध्ये मूलभूत सुविधांसह शेतातील कामांचाही समावेश करण्यात आला. सध्या रस्ते, जलसंधारण, शेततळे, तलाव अशी काम करण्यात येतात.

कुही तालुक्यात आणि नागपूर ग्रामीण भागात ही योजना सुरू आहे, बंद आहे, की सुरू आहे हे समजेनासे झाले आहे. आधीसारखे मजूर दिसून येत नाही. त्यांची जागा यंत्राने घेतली आहे. मात्र, ज्या मजुरांना प्रत्यक्ष कामाची गरज आहे. त्यांना काम मिळत नसल्याचे दिसून येते. कुही तालुक्यात काही भागात रोजगार हमीची कामे सुरू असली तरी त्यात मजुरांना कितपत काम मिळत आहे हा वादातीत विषय आहे.

काही ठिकाणी मजुरांची हजेरी दाखवून यंत्राने काम होत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे हाताला काम मिळणे फार मुश्कील झाले आहे. सरकार दरबारी मजुरांच्या नोंदी होत असल्या तरी प्रत्यक्षात किती मजुरांना काम मिळाले हे सांगणे कठीण झाले आहे.

अवकाळीमुळे शेतकरी झाला शेतमजूर

नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीसाठी लावलेल्या खर्चापेक्षा अर्धेही उत्पन्न झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेचा आधार होता. मात्र तिथेही यंत्र आल्याने त्यांना काम मिळणे मुश्कील झाले आहे. शेतात राबणारा शेतकरी आता शेतमजूर झाल्याचे दिसून येते.

सरकारची १०० दिवस काम देणारी योजना राज्य आणि केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सरकार फक्त आश्वासन आणि जाहिरातबाजी करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्षात मात्र, मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे चित्र आहे.

यामुळे ग्रामीण भागातील मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तातडीने रोहयोची कामे करावी. आधार संहितेचा बागुलबुवा न करता तीन महिने तातडीने काम सुरू करावीत. - राजानंद कावळे, शेतकरी व कामगार नेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Purpravan Gave: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६५ गावे पूरप्रवण

Alu Farming Success: वर्षभर अळूला तयार केली बाजारपेठ

Farmer ID for Loan Waiver : २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी 'फार्मर आयडी' अनिवार्य?

Saline Soil Farming Success: अभ्यासूवृत्तीतून खारपाणपट्ट्यात यशस्वी शेती

Tractor Taxation Debate: ‘लक्झरी कार’चा कर ट्रॅक्टरला कशासाठी?

SCROLL FOR NEXT