Wheat Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Crop : थंडीमुळे गहू पीक जोमात

Pune Wheat Production : पुणे विभागात आतापर्यंत ६४ टक्क्यांवर पेरणी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे ः सध्या राज्यात चांगली थंडी असल्याने किमान तापमानाचा पारा १० अंश सेल्सिअसखाली आला आहे. यामुळे गव्हासाठी पोषक हवामान तयार झाले असून पुणे विभागात गहू पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे.

आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी एक लाख ८ हजार २९१ म्हणजेच ६४ टक्के पेरणी झाली असून पिके जोमात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा कमी झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. त्यातच गव्हाच्या पेरणीस नोव्हेबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र दिवाळीनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे पोषक वातावरण तयार झाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली. सध्या अनेक ठिकाणी गहू पिके वाढीच्या अवस्थेत आहे.

पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ ही तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जात असून, विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातही चांगल्या पेरण्या झाल्या असून, आतापर्यंत सर्वाधिक गव्हाचे पेरणी नेवासा तालुक्यात झाली आहे. सुमारे ९ हजार २९२ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल नगर, पाथर्डी, पारनेर, पाथर्डी, राहाता, कर्जत या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे. तर राहुरी, संगमनेर, अकोले या तालुक्यांत काहीशा कमी पेरण्या झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे तीन हजार ६३९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ शिरूर, बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहे. तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, पुरंदर तालुक्यांत कमी पेरण्या झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सुमारे ५ हजार ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे. बार्शी तालुक्यात कमी पेरणी झाली आहे.


पुणे विभागात झालेली गव्हाची पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्केवारी
नगर --- ८६,४०५ -- ६६,३०८ ---७७
पुणे --- ३९,८०३ --- १६,१६४-- ४१
सोलापूर --- ४२५८८ --- २५,८१९ -- ६१
एकूण -- १,६८,७९६ -- १,०८,२९१ -- ६४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT