Agriculture Electricity Connection agrowon
ॲग्रो विशेष

Electricity : वादळी वारा आला, वीजपुरवठा खंडित झाला

Power Supply : वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे.

Team Agrowon

Partur News : तालुक्यातील काही भागांत गेल्या आठवडाभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महावितरणच्या वतीने सध्या तालुक्यात युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने कमी अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

अनेक भागांत लाइट असण्याने मोठ्या अडचणीला सामोरे लागत आहे. दरम्यान, तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गावांतील ३३ केव्हीची लाइन बंद आहे. अनेक ठिकाणी दुरुस्ती केली आहे. तसेच, काही ठिकाणी दुरुस्तीची कामे चालू आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीची कामे हातात घेतली जाणार असल्याची माहिती महावितरण कंपनीने दिली आहे.

महावितरणकडे मनुष्यबळाचा अभाव

विजेचे पडलेले खांब हा महावितरणसाठी डोकेदुखीचा विषय झाला आहे. विजेचे पडलेले खांब बसविणे हे तसे मोठे जिकिरीचे काम आहे. काही कंत्राटदारांकडून विजेचे खांब बसविण्यात येतात.

तथापि, महावितरण कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबद्दल ग्रामीण भागातील गावकरी महावितरण कंपनीच्या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव महावितरण कंपनीकडे आहे. मात्र, हे काम तातडीचे असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

पिठाच्या गिरण्या बंद

ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. पिठाच्या गिरण्या बंद असल्याने घरामध्ये पीठ नाही. अनेकांना तांदळावर भूक भागवावी लागत आहे. वीज नसल्याने विंधन विहिरी, विद्युत मोटारी बंद आहेत. त्यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तसेच, मोबाइलच्या चार्जिंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : सोलापूरमध्ये कांदा टर्मिनल उभारा; कांदा धोरण समितीची राज्य सरकारला शिफारस

Sugarcane Rat: ‘सहकार शिरोमणी’ देणार जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर

Konkan Produce: कोकणच्या शेतीमालाचा वसईकरांना गोडवा

Maharashtra Politics: भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वरुन शिवसेनेत प्रचंड नाराजी, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, काय निर्णय घेणार?

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; उडीद दबावातच, कांदा दर स्थिर, काकडीला किंमतीत वाढ तर हरभऱ्याला दर कमीच

SCROLL FOR NEXT