Electricity Connection : नागपूर परिमंडलात वर्षभरात ८४ हजार नवीन वीज जोडणी

Electricity Update : नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडलात गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीत ८४ हजार ६७२ नवीन लघुदाब वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
Electricity Connection
Electricity ConnectionAgrowon

Nagpur News : नागपूर आणि वर्धा शहरांसह महावितरणच्या नागपूर परिमंडलात गेल्या आर्थिक वर्षात सर्व वर्गवारीत ८४ हजार ६७२ नवीन लघुदाब वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. यापैकी तब्बल ६५ हजार २७ घरगुती, १० हजार ५०७ वाणिज्यिक, १३४९ औद्योगिक आणि ५ हजार ५५१ कृषी जोडण्यांचा समावेश आहे. याशिवाय परिमंडळात तब्बल ४२ ई वाहन चार्जिंग स्टेशनला वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.

ग्राहकसेवा अधिक गतिमान करण्यासाठी नवीन वीजजोडणी तत्काळ उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी नवीन वीज जोडण्यांचा वेग वाढविण्यावर भर दिला आहे. नागपूरचे परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडळात ‘इज ऑफ लिव्हिंग या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत.

Electricity Connection
Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी शेतकऱ्यांची धावपळ

यापूर्वी महावितरणच्या नागपूर परिमंडलामध्ये दर वर्षी साठ ते सत्तर हजार वीज जोडण्या दिल्या गेल्या, मागील आर्थिक वर्षात नवीन वीज जोडण्या देण्याच्या कामाला नियोजनपूर्वक वेग देण्यात आल्या असून २०२३-२४ मध्ये तब्बल ८४ हजार ६७२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

Electricity Connection
Electricity Issue : नियमित विजेची नागरिकांची मागणी

महिन्यात सरासरी ७ हजारावर जोडण्या

यापूर्वी दरमहिन्यात ५ ते ६ हजार नवीन वीज जोडण्या देण्यात येत होत्या. हा वेग गेल्या आर्थिक वर्षात २०२३-२४ दरमहा सरासरी ७ हजारावर वर गेला. मागील आर्थिक वर्षात ८४ हजारांहून अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची नागपूर परिमंडलाची कामगिरी आनंददायी आणि समाधान देणारी आहे. हा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्पष्ट केले.

कोणत्या भागात दिल्या नवीन वीज जोडण्या

वर्गवारी नागपूर ग्रामीण नागपूर शहर वर्धा एकूण

घरगुती १६,९७९ ३८,८५८ ९१९० ६५,०२७

व्यावसायिक १९६३ ६,६७० १८७४ १०,५०७

औद्योगिक ४९६ ६१३ २४० १३४९

कृषी २,७४३ २३४ २५७४ ५,५५१

चार्जिंग स्टेशन १० २९ ०३ ४२

इतर ७२४ १०५८ ४१४ २,१९६

एकूण २२,९१५ ४७,४६२ १४,२९५ ८४,६७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com