Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jayakwadi Dam : नाशिकमध्ये पावसाची संततधार; जायकवाडीत पाण्याची आवक वाढली, चिंता मात्र कायम 

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. 

Aslam Abdul Shanedivan

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची रिपररिम सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. दरम्यान इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाचा पाणीसाठा ७० टक्क्यांपर्यंत गेला असून जायकवाडीत पाण्याची आवक वाढली आहे. दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या पाण्यात वाढ होत आहे.  

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवामानशास्त्र विभागाने राज्यात पावसाचा जोर असेल असा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस असेल. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, नागपूर, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. 

दरम्यान साम टीव्हीच्या वृत्तानुसार, मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे येथील नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. यामुळे नाशिकरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार ६९.१५ टक्कांवर गेला आहे. जो गेल्या वर्षी याच दिवशी ८१.८० टक्क्यांवर होता. तर इगतपुरी तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या दारणा धरणातून ६,७३८ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 

जायकवाडी धरणात ९.९१ टक्के पाणीसाठी

तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात गेल्या आठ दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे दारणा धरणातील पाणीसाठा ८५.५२ टक्के झाला आहे. त्यामुळे गेल्या ८ दिवसापासून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तसेच गंगापूर धरणातून देखील विसर्ग गोदावरी नदीत पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाणी जात असून धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सध्या जलसंपदाच्या आकडेवारीनुसार धरणात ९.९१ टक्के पाणीसाठी झाला आहे. पण गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील पाणीसाठा ३२.५५ टक्के होता. सध्याचा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा २२.६४ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे अद्यापही जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्या छत्रपती संभाजी नगरकरांची चिंता मिटलेली नाही.  

नाशिक विभागातील धरणे

नाशिक विभागातील सर्व ५३७ धरणातील पाणीसाठा ४८.५० टक्क्यांवर गेला असून सर्व २२ मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा ५४.५७ टक्क्यांवर गेला आहे. तर नाशिक विभागातील अहमदनगर येथील भंडारदरा धरण ९४.५५ भरले आहे. जळगावमधील वाघूर धरण ६४.५४ टक्के भरले असून नाशिकमधील भाम धरण १०० टक्के भरले आहे. तर भावली ९९.५८ टक्क्यांवर पोहचले असून असाच पाऊस राहिल्यास ते १०० टक्के भरले. तसेच दारणा, गंगापूर क्रमश: ८५.५२ आणि ६९.१५ टक्के भरले आहे. तर मुकणे धरण देखील ४०.५५ टक्क्यांवर गेले असून वैतरणा जलविद्यूत प्रकल्पात ७०.४१ पाणीसाठा झाला आहे. वाकी धरणात देखील ५० टक्क्यांवर पाणीसाठा झाला असून या धरणात सध्या ५२.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

अद्यापही टँकरने पाणीपुरवठा सुरूच

दरम्यान नाशिक जिल्ह्यात पावसाच्या सऱ्या बरसत असल्यातरिही जिल्ह्यातील १६३ गावे आणि ५५० वाड्यावस्तांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. येथे १३ शासकीय आणि १६७ खाजगी अशा १८० टँकरने पाणीपुरठा केला जात आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT