Tur crop  agrowon
ॲग्रो विशेष

Tur Crop : पाण्याअभावी कोरडवाहू तुरीची स्थिती बिकट

Tur Production : खानदेशात कोरडवाहू तुरीची अनेकांनी लागवड केली आहे. परंतु परतीचा पाऊस न आल्याने पिकाला आता पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी पीकस्थिती खराब होत असून, फुले गळून पडत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कोरडवाहू तुरीची अनेकांनी लागवड केली आहे. परंतु परतीचा पाऊस न आल्याने पिकाला आता पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी पीकस्थिती खराब होत असून, फुले गळून पडत आहेत.

खानदेशात सुमारे २१०० हेक्टरवर तूर पीक आहे. रावेर, बोदवड, मुक्ताईनगर भागांत मुख्य पीक म्हणून तुरीची लागवड अनेकांनी केली आहे. तसेच आंतरपीक म्हणूनही एकरी ७० ते ८० किलो उत्पादन अनेक शेतकरी साध्य करतात. खानदेशात कोरडवाहू तुरीची लागवड जळगाव जिल्ह्यातील बोदवड, जामनेर, रावेर, जळगाव, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, शिरपूर, नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर भागात अधिकची लागवड केली जाते. अनेक शेतकरी मुख्य पीक म्हणून तुरीची लागवड करतात. तर काही शेतकरी कापूस, सोयाबीन पिकांत आंतरपीक म्हणून तुरीला पसंती देतात. तूर कमी पाण्यात येणारे पीक म्हणून ओळखले जाते. काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू तूर पिकाची स्थिती बरी आहे. परंतु हलक्या, मध्यम, मुरमाड जमिनीत तूर पिकात फूलगळ होत आहे. वाढही कमी आहे.

तुरीला परतीच्या पावसाची गरज असते. दसरा सणाला एक पाऊस आला असता, तर तुरीचे पीक खानदेशात जोमात राहिले असते, असाही मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. परंतु तूर पिकाला परतीचा पाऊस पावलाच नाही. यामुळे पिकाची स्थिती कोरडवाहू क्षेत्रात बिकट बनली आहे. अशातच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. याचाही परिणाम पिकात होत आहे.

विषम हवामानाचा फटका

थंडी कायम राहिल्यास पीकस्थिती आणखी खराब होणार नाही. पीकही ३० ते ४० टक्के हाती येईल. परंतु ऑक्टोबरमध्येही उष्णता होती. आताही दिवसा उष्णता, उकाडा व रात्री थंडी, अशी विषम स्थिती आहे. पिकात पाने व फुले गळत असल्याने शेतकरी फवारणीदेखील टाळत आहेत.

इतरांच्या मदतीने सिंचन

काही तूर उत्पादक शेतकरी नजीकच्या कृत्रीम जलसाठाधारक शेतकऱ्याकडून पाणी घेऊन आपल्या तूर पिकाचे सिंचन करून घेत आहेत. परंतु ज्यांच्यानजीक कुठलेही कृत्रीम जलसाठे नाहीत, त्या शेतकऱ्यांसमोर अडचणी आहेत. अनेक शेतकरी एकरी दोन ते अडीच हजार रुपये देऊन आपल्या तुरीला सिंचनासाठी इतरांकडून पाणी उपलब्ध करून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT