Monsoon Session 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Session 2024 : मुसळधार पावसाचा अधिवेशनाला फटका; आमदारांसह मंत्र्यांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नाले-नद्यांना पूर आला आहे. तर अनेक रस्ते बंद झाले आहेत. यामुळे शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबईत सहा तासात ३०० मिलीमिटर पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. याचा फटका रेल्वेला बसला असून अनेक रेल्वे गाड्या उशीरा धावत आहेत. दरम्यान मुसळधार पावसाचा फटका विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. त्यामुळे विधीमंडळाचे कामकाज १ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांना आव्हान केलं आहे.

राज्याचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून सुरू झाले असून पावसाळी अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. मात्र पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरासह राज्यात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांध्ये सध्या पाणीच पाणी अशी स्थिती पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरामध्ये ३०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. त्यातच पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. सध्या ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे लवकरच वाहतूक पूर्वपदावर येईल. मुंबईतील सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. 'गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे', असे आवाहन देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया

मुंबईत गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिमझीम सुरू असून रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. रविवारी रात्री सहा तासांमध्ये ३०० मिमी पाऊस पडला आहे. तर वर्षभरात पडणाऱ्या पावसापैकी १० टक्के असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तर भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तर वर्षातील ३६५ दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे असेह आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्रींच रेल्वे ट्रॅकवर

राज्याचे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. यादरम्यान मुसळधार पवासाचा फटका मुंबईत अधिवेशनासाठी जाणाऱ्या काही आमदारांसह मंत्र्यांना बसला. यात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे. तर रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने संजय गायकवाड, अमोल मिटकरी, जोगेंद्र कवाडे यांसह अनेक आमदार रेल्वेत अडकले आहेत. अधिवेशनाला जाण्यासाठी मंत्री अनिल पाटील, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक आमदारांनी रुळावरुन चालत प्रवास केला. तर मंत्री मुश्रीफ यांनी कल्याणमध्ये अडकलेली महालक्ष्मी एक्स्प्रेस सोडली आहे. मुश्रीफ गाडीने अधिवेशनासाठी विधानभवनाकडे रवाना झाले आहेत.

मुंबईसह कोकणातील शाळांना सुटी

दरम्यान मुसळधार पावसाने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले. अनेक नद्यांना पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. तर मुंबईत रेल्वे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकरांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT