Kranti Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Krantisugar Factory : थकीत पगार त्वरित न दिल्यास ‘क्रांतीशुगर’वर कामगारांचा बहिष्कार

Sugarcane Season : क्रांती शुगर कंपनीला अनेक वेळा मागणी करूनही पारनेर कारखाना कामगारांचे थकीत पगार मिळत नाहीत.

Team Agrowon

Nagar News : देवीभोयरे (ता.पारनेर) येथील क्रांती शुगर कंपनीला अनेक वेळा मागणी करूनही पारनेर कारखाना कामगारांचे थकीत पगार मिळत नाहीत. त्यामुळे थकीत पगार दिला नाही तर कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव कामगारांनी देविभोयरे येथे झालेल्या बैठकीत घेतला आहे.

विक्री कराराचा भंग करून व न्यायालयाकडून ‘जैसे थे’चा आदेश असतानाही या कंपनीने पारनेर कारखान्याची मशिनरी भंगारात विक्रीचा निर्णय घेताच पारनेरचे कामगार व कारखाना बचाव समिती आक्रमक झाली आहे.

देवीभोयरे येथे पारनेर कारखान्याच्या कामगार, शेतकरी व कारखाना बचाव समिती यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत क्रांती शुगर कंपनीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती कामगार नेते बाबूराव मुळे यांनी दिली.

सोमवारी (ता.४) कारखाना प्रशासनाला निवेदन देवून आठ दिवसांत गेट बंद आंदोलन व साखळी उपोषण करणार असल्याची माहिती कारखाना बचाव समिती, शेतकरी व कामगारांनी दिली. थकीत पगार लवकर न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून कारखाना बंद पाडण्याचा इशारा कामगारांनी दिला.

बैठकीला कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव साळुंके, सतीश रासकर, रामदास सालके, गोविंद बडवे, सुनील चौधरी, कांता लंके, मंगेश वराळ, सोमनाथ वरखडे, शंकर गुंड, सागर गुंड, बाबूराव मुळे, सुभाष बेलोटे, तात्या चत्तर यांच्यासह कामगार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dryland Wheat: कोरडवाहू परिस्थितीत भरघोस उत्पादन देणारे गव्हाचे ५ वाण

Maha Pashudhan Expo 2025: परळीत १०-१२ डिसेंबरदरम्यान भरणार महापशुधन एक्स्पो २०२५ ; ५.८४ कोटींचा शासन निर्णय जाहीर

Sugarcane Price Protest: कोल्हापूर ऊसपट्ट्यात मोठ्या आंदोलनाची तयारी, ऊसदरावरून राजू शेट्टींची शेतकऱ्यांना हाक

Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपाचे २.८१ टक्के साध्य

Banana Crop Insurance: आंबिया बहरातील केळी पिकासाठी विमा योजना

SCROLL FOR NEXT