ॲग्रो विशेष

Kolhapur Agriculture College : राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. रविंद्र बनसोड.

Ravindra Bansod : कोल्हापूर येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. रविंद्र दलपतराव बनसोड हे रुजू झाले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : कोल्हापूर येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी डॉ. रविंद्र दलपतराव बनसोड हे रुजू झाले आहेत. डॉ. रविंद्र बनसोड हे मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी विषयातील तज्ञ असून त्यांनी देशपातळीवर नावाजलेल्या आयआयटी, खडगपूर येथून एम टेक प्रथम श्रेणीतून पूर्ण करून पंतनगर येथील जी बी पंत विद्यापीठातुन ८२ टक्के गुणांसह आचार्य पदवी प्राप्त केली असून भारतीय कृषि शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत घेतली जाणारी आयसीआर नेट परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण केली आहे.

तसेच एडिआयटी डिप्लोमा ८७ % गुण मिळवून पूर्ण केला आहे. कृषि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठातापदी निवड होण्यापूर्वी डॉ. बनसोड गणेशखिंड, पुणे येथील मैदानी विभाग कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृदा जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे तसेच प्रक्षेत्र संरचना व ग्रामीण विद्युतीकरण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहिले असून ते कृषि महाविद्यालय पुणे येथे कृषि अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख तसेच स्थावर व्यवस्थापक म्हणूनही कार्यरत होते.

आपल्या ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये विद्यार्थी कल्याण अधिकारी, विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष तसेच संयुक्त संशोधन परिषदेचे समन्वयक अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. आपल्या सेवेच्या सुरुवातीच्या १९८७ ते २००३ या काळात ते कृषि महाविद्यालय कोल्हापूर येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थि प्रिय शिक्षक असलेल्या डॉ. रविंद्र बनसोड यांनी आचार्य पदवीच्या पाच, एम. टेक. पदवीच्या बारा तसेच बी. टेक. पदवीच्या ३७ विद्यार्थ्यांना संशोधनपर मार्गदर्शन केले आहे.

तसेच डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी महाविद्यालया मार्फत २०१५ साली, संस्कार प्रतिष्ठानमार्फत २०२० साली आणि नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषि शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत २०१९ साली राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांना शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुल्य योगदाना बद्दल डॉ. एपीजे अब्दुल कलाम जिवन गौरव पुरस्कार, लोकसत्ताचा राज्यस्तरीय कृषि रत्न पुरस्कार, राज्य व देशपातळीवरील उत्कृष्ट संशोधक पुरस्कार, तसेच विविध संशोधन परिषदांमध्ये गौरविण्यात आले आहे.

शिक्षण, संशोधन आणि कृषिविस्तार क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान दिलेले डॉ.रविंद्र बनसोड यांनी क्रीडाक्षेत्रातही नैपुण्य मिळविले असून जिल्हा व राज्यस्तरीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धांमध्ये त्यांनी वेळोवेळी सुवर्ण, रजत व कांस्य पदके मिळविली आहेत. सन २०१९ मध्ये ते मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झालेले आहेत व सन २०२२ आणि २०२३ मध्ये त्यांची अनुक्रमे फिनलँड व स्वीडन येथे निवड झाली आहे.

डॉ. बनसोड हे वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळपटू असून गोविंद वल्लभ पंत विद्यापीठ, पंतनगर उत्तराखंड येथे त्यांनी सलग दोन वर्षे खुल्या विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद व पदव्युत्तर व विवेकानंद भवन अशी एकूण चार अजिंक्यपदे मिळविली आहेत. याशिवाय त्यांनी २००३मध्ये बुद्धिबळातील प्रतिष्ठेची विवेकानंद भवन चॅम्पियनशिप पटकाविली आहे.

ओपन स्टाफ मैदानी स्पर्धा तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील मास्टर्स अथलेटिक्स स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. रविंद्र बनसोड यांची सहयोगी अधिष्ठातापदी निवड झाल्यानंतर महाविद्यालयाच्या विभागप्रमुख, प्राध्यापक व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT