Tur Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Crop : पाण्याअभावी कोरडवाहू तूर धोक्यात

Tur Production Affected : पावसाने मारलेली दांडी व ऑक्टोबर महिन्यातील उष्म्यासह परतीच्या पावसाने मारलेली चाट यामुळे तुरीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनाची सरासरी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Team Agrowon

Amravati News : विलंबाने आलेला मॉन्सून, ऑगस्टमधील पावसाचा खंड, वाढीच्या काळातच पावसाने मारलेली दांडी व ऑक्टोबर महिन्यातील उष्म्यासह परतीच्या पावसाने मारलेली चाट यामुळे तुरीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनाची सरासरी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात सव्वालाख हेक्टरमध्ये तुरीची पेरणी यंदाच्या खरीप हंगामात झाली आहे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून तुरीची शेतकरी आंतरमशागतही करतात. परतीचा पाऊस न आल्याने पिकांना आता पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याअभावी पिकांची स्थिती खराब होत असून फुले गळू लागली आहेत. काळ्या कसदार जमिनीवरील तूर बरी असली तरी हलक्या

मुरमाड व मध्यम जमिनीवरील तूर पिकांत फूलगळ सुरू झाली असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. उत्पादनाची सरासरी घसरण्याच्या शक्यतेने त्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. सध्या तुरीला बाजारात हमीदरापेक्षा अधिक भाव आहे. साडेअकरा हजारांवर भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.

या हंगामातही भाव चढे राहतील, अशी शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादनाची सरासरी मिळणे आवश्यक आहे. थंडीचा जोर अद्यापही हवा तसा वाढलेला नाही. रात्री थोडी थंडी राहत असली तरी दिवसा मात्र तापमानात वाढ असल्याने उष्मा वाढला आहे.

सिंचनाची सोय असलेले शेतकरी तूर वाचवू शकण्याच्या स्थितीत असले तरी कोरडवाहू पट्ट्यातील शेतकऱ्यांसमोर मात्र संकट आहे. परतीचा पाऊस झाला असता तर तूर चांगली तरारली असती, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. मात्र तुरीची फूलगळ बघता उत्पादनाच्या अपेक्षेवर पाणी फेरल्या जाण्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra crop damage : राज्यात १२ ते १४ लाख एकरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका; मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा

Fish Farming : विदर्भात मत्स्य व्यवसायातून निळ्या क्रांतीला चालना

Illegal Pest Control : विनापरवाना पेस्ट कंट्रोल करणाऱ्या विरोधात ‘गुणनियंत्रण’ची कारवाई

Backyard Poultry : सुधारित पद्धतीने परसातील कुक्कुटपालन

Pearl Farming : शिंपल्यांच्या शेतीतून दर्जेदार मोती

SCROLL FOR NEXT