Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : नगर जिल्ह्यातील ९६ महसूल मंडलांत दुष्काळस्थिती

Team Agrowon

Nagar News : राज्यातील अनेक तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असताना नगर जिल्ह्यातील दुष्काळी गावे वगळली होती. सततच्या मागणीनंतर अखेर नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ९६ महसुली मंडलांचा दुष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंडलांतील गावांना दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणाऱ्या सर्व सवलतींचा लाभ मिळणार आहे.

नगर जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे काही अपवादातील गावे सोडली तर बहुतांश गावांत दुष्काळी स्थिती आहे. शासनाने मागील काही दिवसांपूर्वी जे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. त्यात नगर जिल्ह्यातील एकही तालुका नव्हता.

त्यामुळे नगर जिल्ह्यातील सर्वच गावांना दुष्काळी योजनांपासून वंचित रहावे लागणार असल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. गुरुवारी (ता.९) राज्यात ९५९ मंडलांत दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात नगर जिल्ह्यातील ९७ पैकी ९६ महसूल मंडलांचा समावेश आहे.

नुकताच केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला.‌ मात्र जिल्ह्यातील तालुक्यातील पर्जन्यमानाची टक्केवारी ७५ पेक्षा कमी आणि ७५० मिमीपेक्षा कमी पाऊस पडलेला हा निकष लक्षात घेऊन नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ९६ गावांचा समावेश आता दुष्काळी गावांच्या यादीत झाल्याने नव्याने अस्तित्वात आलेली महसुली मंडळे जिथे अद्याप पर्जन्यमापक बसवलेले नाहीत किंवा बिघडलेली आहेत अशा मंडलांचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविले आहेत.

श्रेयासाठी चढाओढ

नगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्वच स्तरातून सुरू होती. गुरुवारी (ता.९) नगर जिल्ह्यातील ९७ पैकी ९६ महसूल मंडलांत दुष्काळ जाहीर केल्याने सर्व सवलती मिळणार आहे. त्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. त्यानंतर आमदार नीलेश लंके यांनीही आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे दुष्काळ जाहीर झाल्याचे सांगितले. जाहीर झालेल्या दुष्काळाबाबत श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे.

दुष्काळ सदृश जाहीर केलेली महसूल मंडले

नगर : नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुई छत्तीशी,

अकोले : विरगाव, समशेरपूर, साक्रीवाडी, राजुर, शेंडी, कोतूळ, ब्राह्मणवाडा, अकोले,

जामखेड : जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव,

कर्जत : कर्जत, राशीन, भांबोरा, कंबोळी, मिरजगाव, माही,

कोपरगाव : कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव बोलका, पोहेगाव,

नेवासा : नेसावा खुर्द, नेवासा बुद्रुक, सतलबपूर, कुकाणा,चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा बहिरोबा,

पारनेर : पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हान, वडझिरे, निघोज, टाकळी ढोकेश्वर, पळशी,

पाथर्डी : पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी मानूर, करंजी, मिरी,

राहाता : राहाता, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा, शिर्डी,

राहुरी : राहुरी बुद्रूक, सात्रळ, ताहाराबाद, देवळाली प्रवरा, टाकळीमियॉ, ब्राह्मणी, वांबोरी,

संगमनेर : संगमनेर बुद्रूक, धांदरफळ बुद्रुक, आश्वी बुद्रूक, शिबलापूर, तळेगाव, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे,

शेवगाव : शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एंरडगाव,

श्रीगोंदा : श्रीगोंदा, काष्टी, मांडवगण, बेलवंडी, पेनगाव, चिंबळा, देवदैठन, कोळेगाव,

श्रीरामपूर : श्रीरामपूर, बेलापूर बुद्रुक, उंदिरगाव, टाकळीभाननगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT