Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील नवीन ७९ मंडलांत दुष्काळी सवलती लागू करण्याचा निर्णय शासनाने १६ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार घेतला आहे.
राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या १०२१ महसुली मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करून तिथे सवलती लागू करण्यात आल्या. मंत्रिमंडळ उपसमितीच्या २ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत खरीप हंगाम २०२३ करता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या १०२१ मंडलांपैकी ज्या मंडलांचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आले आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही
अशी नवीन महसुली मंडळी देखील दुष्काळ सदृश मंडळी म्हणून जाहीर करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला अनुसरून सर्व विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तसेच जिल्हाधिकारी लातूर यांच्या ६ फेब्रुवारी २०२४ च्या पत्राद्वारे प्रस्तावास अनुसरून शासन आदेश निर्गमित केला गेला.
त्यानुसार राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडलांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पावसाच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पावसाच्या ७५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला अशा तसेच १० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या एकूण १०२१ महसूल मंडलांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आली.
त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक केंद्र बसविण्यात आले नाही अशी मंडळ आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या २२४ नवीन महसूल मंडळेदेखील दुष्काळसदृश मंडळे म्हणून घोषित करून या मंडळांकरिता दुष्काळी सवलती लागू करण्याला शासनाने मंजुरी दिली आहे.
...या आहेत सवलती
जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट
शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफी
रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर
टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे
जिल्हानिहाय नवीन दुष्काळ सदृशमंडळे
छत्रपती संभाजीनगर : बाबरा, पालोद, उडणगाव, शिवना, अंभई, खुलताबाद, आपेगाव, निलजगाव, घायगाव, जानेफळ, हतनुर, नागद, आमगाव, गाजगाव, आसेगाव, डोनगाव
जालना : कोळगाव, कोकोटे हदगाव, पानेवाडी
परभणी : टाकळी कुंभकर्ण, कावलगाव, पेठशिवनी, रावराजूर, पिंपळदरी, शेगाव, वडगाव, कासापुरी, रामपुरी, ताडबोरगाव, वाघीधानोरा, दुधगाव, मोरेगाव
हिंगोली : खानापूर चित्ता, भांडेगाव, साळवा, सिद्धेश्वर, शिरड शहापूर, पुसेगाव, बाभूळगाव
नांदेड : नांदेड धुगराळा, दिग्रस बू.
लातूर : कान्हेरी, उजनी, तोंडार, नागलगाव, मोघा, आष्टा, हलगरा, भूतमुगळी
बीड : कुर्ला, घाटसावळी, पारगाव (सि), चऱ्हाटा, येळंब घाट, कुसळंब, दादेगाव, डोईठाण, आष्टा ह. ना., पाडळसिंगी, कोळगाव, माटेगाव, मंजरथ, चिंचोली माळी, मसाजोग, मोहा, गोमळवाडा, ब्र. येळंब, खालापुरी.
धाराशिव : पाचपिंगळ, शेळगाव, मस्सा ख., नायगाव, आष्टा, पाथरूड, बेडगा, बलसुर, तामलवाडी आरळी बु.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.