Drought Condition : अवर्षणाचा मच्छीमार सहकारी संस्थांना फटका

Fishermen Cooperatives : पुरेशा पाण्याअभावी ५० टक्के उत्पादनघटीची शक्यता
Drought Condition
Drought ConditionAgrowon

Sangali News : यंदा अल्प पर्जन्यमानाचा फटका मच्छीमार सहकारी संस्थांना बसत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने तलावातील पाणीपातळी खालावत आहे. परिणामी, राज्यातील सुमारे तीन हजार मच्छीमार संस्थांची उत्पादनासह सुमारे ५० टक्के उलाढाल घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे मच्छीमार सहकारी संस्था तोट्यात जाणार असल्याचा अंदाज मत्स्य उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

राज्यात भूजल क्षेत्रातील ३ हजार ३३१ मच्छीमार सहकारी संस्था आहेत. या संस्थांकडे पाटबंधारे आणि जिल्हा परिषदेकडील तलाव हे मत्स्यपालन आणि मासेमारीसाठी हस्तांतरित केले जातात. या संस्था जूनमध्ये तलावातील पाण्याच्या क्षमतेनुसार मत्स्य बोटुकली (मत्स्यबीज) सोडतात.

त्यानंतर सुमारे ७ ते ९ महिन्यांनी विक्री सुरू होते. त्यावर या संस्थांमधील ४ लाख ५ हजार ७४२ सभासदांच्या कुटुंबांचे उपजीविका चालते. आता या सभासदांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

२०२२-२३ या वर्षात राज्यातील भूजल क्षेत्रातून १ लाख ४३ हजार ५४४ टन मत्स्योत्पादन झाले. त्यातून सुमारे १८०६ कोटी ८२ लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

Drought Condition
Fisheries Policy : उदासीनतेमुळे मच्छीमार सहकारी संस्था डबघाईला

राज्यात गेल्या वर्षी उशिरा पावसाला सुरुवात झाली. पावसाचे प्रमाण कमी राहिले. याचा परिणाम तलावांतील पाणीसाठ्यावर झाला. पावसाच्या आशेवर मत्स्य संस्थांनी जूनमध्ये मत्स्य बीज तलावांत सोडले. या दरम्यान तलावामध्ये सुमारे ७० टक्के पाणीसाठा होता. यामुळे मासेमारी व्यवसायातून संस्थांना आर्थिक फायदा होईल अशी आशा होती. मात्र पुढे कमी पाऊस झाला. त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाली नाही.

तलावात पाणी कमी असल्याने माशांची अपेक्षित वाढ होत नसून वजनही मिळत नाही. डिसेंबरमध्येच सुमारे ६० टक्के तलावांत मृतसाठा आणि त्याहून कमी पाणी शिल्लक होते. त्यानंतर पाणीसाठा झपाट्याने घटला. परिणामी, उत्पादनाला फटका बसणार आहे. सुमारे ५० टक्क्यांनी उलाढाल कमी होईल, असा प्राथमिक अंदाजही मत्स्य विभागाने व्यक्त केला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे
- बहुतांश तलावांत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा
- एकूण तलावांपैकी ६० टक्के तलावात मृत पाणीसाठा
- शेतीसाठी पाणी सोडल्याने तलावांतील पाणीसाठा होतोय कमी
- कमी पाणी असल्याने माशांची अपेक्षित वाढ होण्यास अडथळा, त्यामुळे दर मिळण्यास अडचणी
- मत्स्यबीजसाठी गुंतविलेले पैसेही मिळणे मुश्कील
- जिल्हा परिषद विभागांकडील तलाव संख्या ः २०,०१८
- एकूण तलावांचे जलक्षेत्र ः ६६,२७४.९२

भूजल मत्स्य सहकारी संस्था विभाग...संस्था...सभासद संख्या कोकण...४५२...२,६३,९१६ पुणे...४२७...२०,९३४ नाशिक...२५१...१४,३८१ छत्रपती संभाजीनगर...५८३...२१,४५४ लातूर...३२६...८,१६० अमरावती...६२४...२२,८४४ नागपूर...६६८...५४,०५३ एकूण...३३३१...४,०,५७४२ .

.. चौकट ः विभागनिहाय तलाव विभाग...संख्या...एकूण तलावांचे जलक्षेत्र (हेक्टर) पुणे...४०३...४०,४०८.५५ नाशिक...३१२...५४,०८३.२२ छत्रपती संभाजीनगर..३६७...४६,६०६.६६ लातूर...५०५...३७,३४८.७५ अमरावती...४३८...५१,४२८.५० नागपूर...३४९...४१,९२७.५७ मुंबई...११६...१,१०,५६.३२ एकूण...२४९०...२,८२,८५९.५७ ... कोट

गेल्या वर्षी जूनमध्ये तलावात मत्स्य बीज सोडले. मात्र कमी पावसामुळे तलावातील पाणीसाठा वाढला नाही. परिणामी, उत्पादन घटल्याने उलाढालही कमी होईल. त्यामुळे राज्यातील मच्छीमार संस्था आर्थिक संकटात सापडल्या आहेत.

- महादेव कदम, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ, मुंबई ...

संस्थेने दोन तलाव मत्स्यपालनासाठी भाडेतत्त्वावर घेतले आहेत. दरवर्षी १० लाखांची उलाढाल होते. दोन्ही तलावांत दोन लाख मत्स्यबीज सोडले. पण तलावांत पाणीसाठाच नसल्याने माशांची वाढ झाली नाही. त्यामुळे माशांची विक्री करता येत नाही. या वर्षी संस्थेला तोटा होईल.

- संजय कांबळे, सचिव, आम्रपाली मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, कुणीकोणूर, ता. जत, जि. सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com