Sugarcane Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

100 Tone Sugarcane Production : एकरी शंभर टनांपेक्षा अधिक ऊस उत्पादन आवश्यक

Sugarcane Farming : ऊस व दूध हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत बाब आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : ऊस व दूध हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत बाब आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. सातत्याने वापर होत असलेल्या शेतीमध्ये सेंद्रिय द्रव्यांची कमतरता झालेली दिसतेय.

ती भरून काढण्याबरोबर कमी पाणी व कमी श्रमामध्ये एकरी शंभर टनापेक्षा अधिक उत्पादन होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना हे नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून शक्य होईल, असे मत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

वाघापूर (ता. संगमनेर) येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे ऊस विकास मेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ऊस विशेषज्ञ सुरेश माने, कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर कारखाना व सहकारी संस्था सुरू आहेत. अत्यंत काळजीपूर्वक व काटकसरीने कारखान्याचे कामकाज सुरू असून शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी कारखाना कायम कटिबद्ध आहे.

ऊस वाढ योजनेअंतर्गत एकरी शंभर टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन करणे आणि ऊस लागवडीचे नियोजन करणे हे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

ॲड. नानासाहेब शिंदे, संपतराव गोडगे, विनोद हासे, नवनाथ आरगडे, सतीश वर्पे, डॉ. तुषार दिघे, रामदास धुळगंड, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, अंकुश ताजने, रामनाथ कुटे आदी उपस्थित होते. जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT