Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : ठिबक अनुदानाबाबत संभ्रम

Agriculture Irrigation Scheme : खानदेशात जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर भागांतही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात सूक्ष्मसिंचन अनुदान मागील वेळेस उशिरा मिळाले. यात मागील वर्षात अनुदानासंबंधी अर्ज दाखल केलेले अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत. यात यंदाही यासंबंधीचे अर्ज स्वीकारण्यात आले. पण अर्ज मंजूर करून पुढे सर्वेक्षण, पाहणी अहवाल आदी कार्यवाही प्रलंबित आहे. पुढे अनुदान मिळेल की नाही, असा संभ्रम आहे.

खानदेशात जळगाव, चोपडा, यावल, रावेर, जामनेर भागांतही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आहे. शासनाने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच ठिबकबाबत अनुदान मंजूर केले होते. निवडणुकीपूर्वी ही कार्यवाही झाली. नंतर निवडणूक काळात अनुदान आले नाही.

जिल्ह्यासाठी सुमारे २५ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले होते हे. हे अनुदान प्राप्त झाल्यानंतर त्याचे अनेक दिवस वितरणच झाले नाही. परंतु नोव्हेंबरमध्ये काही भागात अनुदान देण्यात आले. अनुदान डीबीटी पद्धतीने देण्यात आले. अनेकांना दुसरा हप्ता एप्रिलमध्ये प्राप्त झाला.

अजूनही जिल्ह्यात सुमारे १५ हजारांवर शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तर यंदा ज्यांनी अर्ज सादर केले, त्यांना अनुदान मिळेल की नाही, असा संभ्रम आहे. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक खरेदी करून अर्ज सादर केले आहेत. त्यासाठी मोठा निधी लागला आहे.

हा निधी उसनवारीने पैसे घेऊन उभारावा लागल्याची प्रकरणेही आहेत. कारण ठिबक उधारीवर कुणी देत नाही. पूर्वी शासनाकडून अनुदान मिळण्याची हमी होती. यामुळे ठिबक वितरक उधारीवर किंवा निम्मा खर्च घेवून देत होते.

परंतु मागील दोन वर्षे अनुदानास होणारा विलंब, कृषी विभागाकडून होणारी टोलवाटोलवी आणि अस्थिरता यामुळे वितरकही संभ्रमात व सावध आहेत. महाडीबीटी पोर्टलवर यासंबंधीचे अर्ज स्वीकारले जात नव्हते.

नंतर अर्ज स्वीकृती सुरू झाली. पण अर्ज स्वीकृतीनंतर ते मंजूर करणे, शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासंबंधी सूचना व पुढील पाहणी, सर्वेक्षण ही कार्यवाही अनेक भागात झालेली नाही. ठिबक अनुदानाबाबत अधिकची अडचण दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT