Gharkul Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Gharkul Scheme : साताऱ्यातील ५८ हजार सामान्यांच्या घराचे स्वप्न कागदावरचं...!

PM Awas Yojana : सर्वसामान्य कुटुंबातील लोकांच्या स्वप्नातील घराला आकार देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना ही १९९५-९६ पासून सुरू केली.

हेमंत पवार

Karad News : सर्वसामान्य कुटुंबातील लोकांच्या स्वप्नातील घराला आकार देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजना ही १९९५-९६ पासून सुरू केली. शासनाकडून घरकुलासाठी एक लाख २० हजार रुपये अर्थसाहाय्य केले जाते. २०२२ नंतर सातारा जिल्ह्यात या योजनेच्या प्रतीक्षा यादीतील प्रस्तावांना केंद्र शासनाकडून मंजुरी मिळालेली नसल्याने जिल्ह्यातील ५८ हजार २७ लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेतच असून त्यांचे घराचे स्वप्न मंजुरीविना कागदावरच राहिले आहे.

अशी केली जाते लाभार्थी निवड

ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील, बेघर, कच्चेघर असलेल्या कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी पंतप्रधान आवास योजनेतून अर्थसाहाय्य देण्यात येते. लाभार्थ्यांची निवड ही ग्रामपंचायतीमार्फत ग्रामसभेत गावातील लोकांच्या समोर केली जाते. तयार केलेली प्रतीक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाते. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्याची घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी अशीही अट आहे.

रोजगार हमी योजनेची जोड

घरकुलासाठी आणखी आर्थिक साहाय्य व्हावे यासाठी रोजगार हमी योजनेची जोड देण्यात आली आहे. घरकुल बांधकामासाठी स्वतः लाभार्थी हा मजूर म्हणून काम करू शकतो. त्यासाठी त्याने स्वतःचे जॉबकार्ड काढून नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यातून घरकुलासाठी संबंधित लाभार्थ्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत ९० दिवस मजुरी पूर्ण केल्यावर त्याला २३ हजार रुपये मिळतात. त्यातून त्याला आर्थिक हातभार मिळतो.

शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान

शासनाकडून घरकुलासाठी एक लाख २० हजार रुपये मिळतात. सध्याच्या महागाईच्या काळात एवढ्या कमी किमतीत घरकुलाचे बांधकाम होत नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्याला सरकारकडून विविध मार्गाने आर्थिक मदत केली जाते. त्याअंतर्गत घरासाठी शौचालयाची उभारणी करण्यासाठी अनुदान दिले जाते. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी१२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

असे मिळते अनुदान

- घराचा पाया खोदणीसाठी १५ हजार

- पाया भरणीनंतर ४५ हजार

- घर चौकट लेव्हला आल्यावर ४० हजार

- घरकुल पूर्ण झाल्यावर २० हजार

- घरकुलासाठी मिळणारे एकूण अनुदान एक लाख २० हजार

- रोहयोतून ९० दिवस मजुरी पूर्ण केल्यावर २३ हजार

पावसाळ्यात मोठे हाल

घरकुलासाठी अर्ज केलेल्यामध्ये अनेकांची घरे कुडामेडाची, जीर्ण झालेली आहेत. पावसाळ्यात संबंधित घरात राहणेही मुश्कील होते. घरात ओल साचून आजारी पडण्याचेही प्रमाण मोठे आहे. अनेकांच्या घरावरील पत्र्यावर आणि दोन्ही बाजूच्या भिंतींना प्लॅस्टीकचे जाड कागद लावावे लागत असल्याचे लाभार्थी सांगत आहेत.

जिल्ह्यातील घरकुल लाभार्थींची स्थिती

तालुका प्रतीक्षेतील लाभार्थी संख्या

जावळी २७९५

कऱ्हाड ८९९८

खंडाळा २०९३

खटाव ६४३१

कोरेगाव ५२६५

महाबळेश्वर ११६५

माण ३९०७

पाटण १२३५१

फलटण ४९४६

सातारा ७५८६

वाई २४९०

एकूण ५८,०२७

घरकुलासाठी दोन वर्षे आम्ही वाट पहात आहोत. मात्र मला त्या घरकुलाचा लाभ अद्याप मिळालेला नाही. पंचायत समितीकडे विचारणा केल्यावर केंद्र सरकारकडून अद्याप घरकुलांना मंजुरी मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पावसाळ्यात सध्याचे घर गळत असल्यामुळे राहण्याची मोठी गैरसोय होते.
- दीपाली मलगवंडे, घरकुल प्रतीक्षा यादीतील महिला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात खरीप पेरणी अंतिम टप्प्यात

Farmer Felicitation : ‘सीसीआरआय’च्या वर्धापन दिनी प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

Melghat Water Scarcity : मेळघाटच्या पाणीटंचाईला ब्रेक

Nanded Water Stock : नांदेडमधील पाणीसाठा ३१ दलघमीने वाढला

Automated Weather Station : सांगलीत स्वयंचलित हवामान केंद्रासाठी ६९६ गावांत चाचपणी

SCROLL FOR NEXT