Research Award in Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Research Award : डॉ. उज्ज्वल राऊत यांना उत्कृष्ट संशोधनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

Research Award in Agriculture : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न कृषी विज्ञान मंचामार्फत हे सहकार महर्षी व लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त उमरखेड येथे कृषिक्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्यांना गौरविण्यात आले.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या फळशास्त्र विभागात कार्यरत सहयोगी प्राध्यापक व फळशास्त्रज्ञ डॉ. उज्ज्वल अजाबराव राऊत यांना फळपिकात केलेल्या संशोधन व विस्तार कार्यासाठी कृषी संशोधक म्हणून गौरविण्यात आले.

उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्न कृषी विज्ञान मंचामार्फत हे सहकार महर्षी व लोकनेते भाऊसाहेब माने यांच्या स्मृतीदिनानिमित्त उमरखेड येथे कृषिक्षेत्रात उल्लेखनीय व विशेष कार्य करणाऱ्यांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात फळपिकाच्या संशोधन व विस्तार कार्यासाठी डॉ. राऊत यांना त्यांनी विविध फळपिकात दिलेल्या अभिवृद्धीच्या संशोधनात्मक शिफारशी तसेच कोरडवाहू फळपिकाच्या माध्यमातून कवठाचा पीडीकेव्ही प्रताप हा वाण विकसित आहे.

नावीन्यपूर्ण फळपिकाच्या माध्यमातून ड्रॅगनफ्रूट, खजूर या फळपिकाच्या संशोधनाच्या कार्याला चालना देण्यासाठी तसेच फळपिकाच्या शास्त्रीय लागवडीबाबत व आर्थिक सक्षमीकरणासाठी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, फळपिकांच्या कल्याणकारी योजना तळागाळात पोचविण्याच्या दृष्टिने संशोधन व विस्तार कार्य केले. याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार गौरविण्यात आले.

या प्रसंगी अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक किसन मुळे, रेशीम संचालनालयाचे सेवानिवृत्त संचालक डॉ. एल. बी. कलंत्री तसेच माजी आमदार विजयराव खडसे, प्रकाश पाटील देवसरकर, उमरखेड कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. विजय माने व भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शेतीमित्र अशोकराव वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT