Technical Efficiency Award : ‘नॅचरल’ला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

Award for Best Technical Performance : नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. या कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन कारखान्यास प्रदान करण्यात आला.
Award
Award Agrowon
Published on
Updated on

Dharashiv News : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने गाळप हंगाम २०२२-२३ चा राज्य पातळीवरील उत्तर-पूर्व विभागातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता तृतीय पुरस्कार नॅचरल शुगर अॅण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि. या कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन कारखान्यास प्रदान करण्यात आला.

Award
Datta Sugar : ‘श्री दत्त’चा सहवीज प्रकल्प ठरला देशात सर्वोत्कृष्ट

या वेळी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री जयंतराव पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे संचालक कृषिभूषण पांडुरंग आवाड,

Award
Sugar Factory : छत्रपती शाहू साखर कारखाना राज्यात सर्वोत्कृष्ट

प्रवर्तक किशोर डाळे, कारखान्याचे वर्कस मॅनेजर संदीप पाटील, प्रोसेस मॅनेजर संजय जाधव आणि कार्यालयीन अधीक्षक श्रीराम साळुंके यांनी स्वीकारला. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न श्री. बी. बी. ठोंबरे यांच्या अथक परिश्रमातून रांजणीच्या माळरानावर आज कृषी पंढरी निर्माण झाली आहे.

धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या नॅचरल उद्योग समूहाने शेतकरी व सर्व सामान्य जनतेच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण केली आहे. नॅचरल शुगर कारखान्यास पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कषीरत्न बी. बी. ठोंबरे, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कारखान्याचे ऊस उत्पादकांकडून कौतुक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com