Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Mechanization : कपाशी पिकात यांत्रिकीकरण गरजेचे ; डॉ. प्रसाद

Cotton Production : कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच्या उत्पादकता वाढीसाठी सघन, अतिसघन तसेच दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. परंतु मजुरांच्या समस्येमुळे अडचणी येत आहेत.

Team Agrowon

Parbhani News : परभणी ः कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच्या उत्पादकता वाढीसाठी सघन, अतिसघन तसेच दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. परंतु मजुरांच्या समस्येमुळे अडचणी येत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी कपाशीमध्ये लागवड ते कापूस वेचणी कामाचे यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे. तरच कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्र टिकून राहील, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केले.

केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि परभणी कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत सघन, अतिसघन, दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानावर शनिवारी (ता. ८) आयोजित शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मी देशमुख होत्या. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी उद्‍घाटक होते.

भारतीय किसान संघाचे प्रांत संघटन मंत्री (महाराष्ट्र, गुजरात व गोवा) दादा लाड, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, मोनिका सरनाईक, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या विशेष कापूस प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अर्जुन तायडे, डॉ. सुनील महाजन, डॉ. निळकंठ हिरेमणी, डॉ. सुहास कुरकुटे, अमित तुपे आदी उपस्थित होते. डॉ. प्रसाद म्हणाले, की मागील दोन वर्षांपासून देशातील ८ राज्यांतील ६१ जिल्ह्यांतील १५ हजारांवर शेतकऱ्यांच्या शेतावर विशेष कापूस प्रकल्प राबविला जात आहे.

कॉटन मिशन केंद्र सरकारला सादर केलेल्या प्रस्तावामुळे अर्थसंकल्पात २ हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असून, त्याचा फायदा कापूस उत्पादक राज्यातील शेतकऱ्यांना होईल. दादा लाड म्हणाले, की गळफांदी काढून टाकल्यास आणि कमरेइतकी उंची ठेवल्यास निश्‍चितच कापसाची उत्पादकता वाढते. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की शेतकऱ्यांनी सघन, अतिसघन, दादा लाड कापूस लागवड तंत्राचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. 

यांत्रिकीकरणासाठी संपूर्ण बोंडाची एकदाच वेचणी करता येणारे वाण विकसित करावे लागतील. कपाशीची उत्पादकता वाढीसाठी कृषी विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांच्या सोबत आहे. डॉ. बेग म्हणाले, की सघन लागवडीसाठी सरळ वाण उपयुक्त आहेत.

चव्हाण म्हणाले, की कापूस उत्पादकता वाढीचे तंत्रज्ञान कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविता येईल. उच्च उत्पादन घेणाऱ्या मानोली (ता. मानवत) येथील रामराव शिंदे, पारवा (ता. पालम) येथील ज्ञानोबा कऱ्हाळे, आवलगाव (ता. सोनपेठ) येथील योगिराज धोंडगे, विठ्ठल व विद्या गजमल, अशोक तायनाथ, अशोक रोडग, शिवाजी शिंदे आदी शेतकऱ्यांना सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT