Cotton Crop : कपाशी पिकात एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करा

Integrated Crop Management : उत्पादकता वाढविण्यासोबत उत्पादन खर्च देखील कमी करण्याची गरज आहे. यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य, कीड रोग आणि लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
Cotton Crop
Cotton CropAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : कपाशी हे महत्त्वाचे पीक असून, कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी या पिकात एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक, असल्याचे मत राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हातमाळी येथे बुधवारी (ता. ११) आयोजित कापूस प्रक्षेत्र दिवस आणि माझा एका दिवस माझ्या बळीराजासाठी या कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर व केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विशेष कापूस प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत हातमाळी कापूस प्रक्षेत्र दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगरचे तालुका कृषी अधिकारी श्याम गुळवे, मंडळ कृषी अधिकारी श्री. राठोड, केव्हीकेच्या कार्यक्रम समन्वयक इंजि. गीता यादव, विषय विशेषज्ञ तथा विशेष कापूस प्रकल्पाचे सहप्रकल्प अधिकारी डॉ. बस्वराज पिसुरे, डॉ. संजूला भावर तसेच कापूस तांत्रिक तज्ज्ञ सतीश कदम, जयदेव सिंगल, सरपंच हिरालाल लक्ष्मण भगुरे, उपसरपंच सोमीनाथ घायट, श्रीमती प्रभावतीताई पडूळ यांच्यासह गावातील शेतकरी व महिलांची उपस्थिती होती.

Cotton Crop
Cotton Management : कापसामध्ये सिलिकॉनचा वापर

डॉ. पवार म्हणाले, की उत्पादकता वाढविण्यासोबत उत्पादन खर्च देखील कमी करण्याची गरज आहे. यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य, कीड रोग आणि लागवड पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. या पिकामध्ये फवारणी व खतांवर अमाप खर्च होत आहे. दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानामध्ये योग्य वाणाची निवड, बेडवर लागवड, योग्य अंतर आणि संतुलित व गरज लागेल तेव्हाच खतांचा वापर करणे हे लक्षात घेतल पाहिजे.

Cotton Crop
Cotton Management : अतिवृष्टीबाधीत कपाशी पीक व्यवस्थापन

गळ फांदी काढणे व शेंडा खुडणे ही महत्त्वाची कामे आहेत. तसेच कापसाची लागवड ही ९० बाय ३० सेंटिमीटर अंतरावर करावी. या पद्धतीने झाडांची एकरी संख्या वाढून उत्पन्न वाढते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी बेडचा व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर प्रभावीपणे करणे गरजेचे आहे. आणि अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.

ज्यामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा नियमितपणे वापर करणे, जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे, इत्यादी पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. डॉ.पिसुरे यांनी विशेष कापूस प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी इंजि. यादव यांनी कृषी प्रक्रिया उद्योग तर डॉ. भावर यांनी फळबाग लागवड तंत्रज्ञान याबद्दल सविस्तर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com