Crop Insurance Agrown
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविम्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

Team Agrowon

Nanded News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीकविमा पोर्टल चालू झाले आहे. ता. १५ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी अंतिम दिनांकाची वाट न बघता लवकरात लवकर पीकविमा भरून घ्यावा.

तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा, पुनर्गठन करून शासनाच्या एक रुपये पीकविमा योजनेत अधिक सक्रिय सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

पीकविमा भरताना ऑनलाइन सेवा केंद्रचालकांनी सीएससी, आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा.

तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरुस्ती करून घेणेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णत: बदल असेल, तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये, कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधार कार्डवरील सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.

तरी सर्व ऑनलाइन सेवा केंद्रचालकांनी आधार कार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल, तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरित भरून घेऊन शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नावात दुरुस्ती करून घ्यावी. यासाठी शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे असे कृषी विभागाने कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT