Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ राज्याच्या माथी मारू नका

Maharashtra Farmers Protest: यवतमाळ ते कोल्हापूरदरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध होत असून, काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी तो राज्याच्या माथी जबरदस्ती लादू नये अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत महामार्गाविरोधात व्यापक आंदोलन उभे केले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळपासून कोल्हापूरपर्यंत प्रचंड विरोध आहे, तरीही या महामार्गासाठी सरकारचा हट्ट का आहे हे कळत नाही. राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग लादू नका, अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांनी केली.

सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाविषयी स्थगन प्रस्ताव दिला, मात्र सभापती प्रा. राम शिंदे यांनी तो दालनात फेटाळला. मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर या विषयावर बोलण्याची अनुमती दिली. या वेळी पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा उपस्थित करत हा महामार्ग रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द,’ असे फलक हातात घेत घोषणाबाजी केली.

विधान परिषदेत शून्य प्रहरात सतेज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत हा महामार्ग रद्द करण्याची मागणी केली. ते म्हणाले, की आज कृषिदिन आहे, मात्र १२ जिल्ह्यांत गरज नसलेल्या शक्तिपीठविरोधात रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. २० हजार शेतकरी यवतमाळपासून कोल्हापूरपर्यंत हा मार्ग कसा चुकीचा आहे हे सांगण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ज्या वेळी या मार्गाची घोषणा झाली.

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत भूसंपादनासाठी मंजुरी दिली त्या वेळी वित्त विभागाने साडेआठ टक्के व्याजदराच्या कर्जामुळे कसा बोजा वाढणार आहे. १८ टक्क्यांच्या कर्जाची मर्यादा ओलांडून २५ टक्क्यांवर जाणार असल्याचे सांगितले आहे. हा हट्ट राज्यकर्ते का करत आहेत?

रत्नागिरी-नागपूर मार्ग असताना हा मार्ग का, कुठल्या कंत्राटदारासाठी हा मार्ग केला जात आहे. सरकारने हा मार्ग रद्द केला पाहिजे. सरकारने राज्याच्या आणि शेतकऱ्यांच्या माथी हा महामार्ग मारू नये, अशी मागणी केली. दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, ज्योती गायकवाड, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अन्य आमदारांनी शक्तिपीठ विरोधी निदर्शने केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT