Basil Production Agrowon
ॲग्रो विशेष

Basil Production : तुळशीच्या रोपांमुळे वांगणीचे डोणेगाव चर्चेत

Basil Farming : बदलापूरजवळील वांगणी येथील डोणे गावातील नर्सरीमध्ये तुळशीच्या रोपांची मोठ्या संख्येने उत्पादन केले जाते. महिन्याभरात साधारण दोन ते अडीच लाख तुळशींची रोपे या नर्सरीमधून विविध जिल्ह्यात व अनेक राज्यात पाठवली जातात.

Team Agrowon

Badlapur News : कार्तिक शुक्ल द्वादशी या दिवशी तुळशी विवाह व दिवाळी साजरी केली जाते. यानिमित्ताने तुळशीच्या रोपांचीदेखील मोठ्या संख्येने उलाढाल होते. बदलापूरजवळील वांगणी येथील डोणे गावातील नर्सरीमध्ये तुळशीच्या रोपांची मोठ्या संख्येने उत्पादन केले जाते. महिन्याभरात साधारण दोन ते अडीच लाख तुळशींची रोपे या नर्सरीमधून विविध जिल्ह्यात व अनेक राज्यात पाठवली जातात.

बदलापूर शहरापासून साधारण १४ किमी अंतरावरील वांगणी येथील डोणे गावात फूल, फळझाडांच्या अनेक नर्सरी आहेत. यात जगदीश थेटे हे स्वतः या ठिकाणी चार एकर जागेत स्वतःची नर्सरी चालवतात, ज्यात फक्त तुळशीच्या रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. रोजच्या घडीला या ठिकाणी दोन लाखांच्या घरात तुळशीची रोपे पाहायला मिळतात.

तुळशीच्या रोपांना मागणी वाढल्याने थेटे हा व्यवसाय गेल्या १२ वर्षांपासून करत आहेत. साधारण राम तुळशीची पाने ही हिरवीगार असतात. ही तुळस खाण्यास गोड असते; तर कृष्ण तुळशीची पाने गडद हिरव्या जांभळ्या रंगाची असतात.

ही तुळस चवीने थोडी कडवट व तुरट असतात; मात्र दोन्ही तुळशीमध्ये चवीचा फरक सोडला, तर औषधी गुणधर्म हे सम प्रमाणात असल्याचे थेटे यांनी सांगितले. गुजरात, राजस्थानला निर्यात थेटे यांच्या नर्सरीमधून दररोज १५ ते २० हजार रोपांची व महिन्याला साधारण २ ते अडीच लाख रोपांची विक्री केली जाते.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात; तर महाराष्ट्राबाहेर गुजरात, राजकोट, राजस्थान, दक्षिण भारत व इतर राज्यात थेटे यांच्या नर्सरीमधून तुळशीची रोपे विक्रीसाठी पाठवली जातात. यात छोटी-मोठी अशा उंचीतील ३ रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंतची रोपे विक्रीसाठी जातात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Irrigation Advisory: पावसाच्या खंडातील आपत्कालीन उपाययोजना

Irle Dam Land Compensation: इर्लेतील बंधाऱ्याचा मोबदला तब्बल २९ वर्षांनी मिळाला

Cow Dung Machine: गोवरी निर्मिती यंत्राच्या डिझाइनला पेटंट

Revenue Office Citizen Hours: महसूल अधिकाऱ्यांचा दुपारी ३ ते ५ वेळ नागरिकांसाठी राखीव

Agricultural Electricity Issue: विजेच्या लपंडावामुळे शेतकरी त्रस्त

SCROLL FOR NEXT