Rain in Dombivli  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain in Dombivli : पाऊस आला धाऊन, रस्ते गेले वाहून

Mumbai Rain Update : ‘पाऊस आला धाऊन... रस्ते गेले वाहून’ अशी परिस्थिती कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची झाली आहे. शहरातील रस्त्यांची महापालिका प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आली होती.

Team Agrowon

Dombivali Rain Update : ‘पाऊस आला धाऊन... रस्ते गेले वाहून’ अशी परिस्थिती कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची झाली आहे. शहरातील रस्त्यांची महापालिका प्रशासनाकडून दुरुस्ती करण्यात आली होती;

परंतु पहिल्याच पावसात हे रस्ते उखडले गेले असून, मोठमोठे खड्डे रस्त्यांवर पडले आहेत. या खड्ड्यांतून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण होऊन मोठमोठे खड्डे रस्त्यांवर पडले आहेत. केडीएमसी क्षेत्रात दुर्गाडी किल्ल्यासमोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वी गोविंदवाडी पुलावरील रस्ता दुरुस्त करत नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते.

या रस्त्यावरदेखील मोठे खड्डे पडले आहेत. यासोबत मलंगगड रोड, पेंढरकर रोड, एमआयडीसीतील रस्ते, नेहरू रोड, चिमणी गल्ली, आडिवली ढोकळी रोड अशा अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

केडीएमसी क्षेत्रातील रस्ते आणि त्यावरील खड्डे यावरून कायमच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी एमएमआरडीए, एमएसआरडीसी यांच्या आर्थिक साह्याने केडीएमसी हद्दीतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. ही कामे सुरू असतानाच पावसाचे आगमन झाले आहे.

अनेक ठिकाणी चालू असलेल्या ठिकाणी काम पूर्ण करण्याकडे प्रशासन भर देत आहे. मात्र अन्य रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दूर करण्यासाठी त्यांचे डांबरीकरण करणे, खड्डे चरे पॅच मारून भरण्याचे काम पालिका प्रशासनाने केले आहे; पण कंत्राटदारांनी केलेल्या कामाची पोचपावती पहिल्याच पावसाने दिली असून सर्व रस्ते हे पावसाने उखडले गेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT