Pseudo Pulses  Agrowon
ॲग्रो विशेष

Pseudo Pulses : तुम्हाला प्स्युडो कडधान्ये माहिती आहेत का?

“प्स्युडो कडधान्ये” हा एक धान्यपिकांमधील दुर्लक्षित परंतु अतिशय पोषक प्रकार आहे.

Team Agrowon

अन्नप्रक्रिया (Food Processing) उद्योगातील बेकरी पदार्थ, नुडल्स, पास्ता, शेवया इ. तयार करण्यासाठी गहू किंवा तांदूळ पिठाचा वापर केला जातो. पोषणमूल्याचा विचार करता गहू व तांदूळ या धान्यामध्ये पोषकद्रव्यांचे प्रमाण अतिशय कमी असून त्यांपासून तयार केलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थंसुद्धा नेहमीच्या सेवनासाठी पोषक नाहीत. “प्स्युडो कडधान्ये” (Pseudo Pulses) हा एक धान्यपिकांमधील दुर्लक्षित परंतु अतिशय पोषक प्रकार (Healty Food) आहे. प्स्युडो कडधान्य संवर्गामध्ये प्रामुख्याने राजगिरा, किनोवा, बकव्हीट/कुट्टू आणि चिया इ. धान्यांचा समावेश होतो. प्स्युडो कडधान्याबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

प्स्युडो कडधान्यांमधील प्रथिने, तंतूमय पदार्थ, जीवनसत्त्वे व खनिजे इ. चे प्रमाण नेहमीच्या वापरातील गहू किंवा तांदूळ धान्यांपेक्षा भरपूर प्रमाणात आहे. गव्हामधील ‘ग्लुटेन’ या प्रथिनामुळे काही लोकांना ‘सिलीयाक’ हा आजार होतो. प्स्युडो कडधान्यांमध्ये ग्लुटेन नसल्यामुळे ही धान्ये सिलीयाक रुग्णांसाठी सुरक्षित आहेत. 

राजगिरा - राजगिरा पिकाची लागवड प्रामुख्याने भारत, चीन, अमेरिका इ. देशांमध्ये केली जाते. राजगिरा कॅल्शियम आणि लोहाचा उत्तम स्रोत आहे. मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजे राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. 

किनोआ - किनोआची शेती अमेरिका, केनिया, भारत आणि  पेरू या देशात केली जाते. किनोआ चा उपयोग पीठ, सूप आणि अल्कोहोल तयार करण्यासाठी होतो. पिठाचा उपोयोग बिस्किटे, ब्रेड आणि प्रक्रिया केलेले खाद्य तयार करण्यासाठी होतो. किनोआ स्टार्च अत्यंत चिकट असल्यामूळे विविध औद्योगिक प्रक्रियेसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.

बकव्हीट/कुट्टू - कुटू हे धान्य पीक असून याच्या बियांचा आकार हा त्रिकोणी असतो. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश तसेच इतर राज्यांमध्ये व अनेक देशामध्ये कुटूचे उत्पादन घेतले जाते. कुट्टूला इंग्रजीमध्ये बकव्हीट असेही म्हटले जाते. बकव्हीट हे अनेक प्रकारची खनिजे आणि प्रथिनांचा उत्तम स्त्रोत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Project: ‘जायकवाडी टप्पा-२’चा प्रस्ताव आता कॅबिनेटसमोर

Blacklisted Institutions: ‘त्या’ सहा संस्थांना काळ्या यादीतून वगळणार?

Marigold Flower: झेंडूच्या फुलांची आवक बाजारात वाढली

Banana Harvest Issue: खानदेशात अनेक भागांत केळीची काढणी ठप्प

Ethanol Market: उसाला मागे टाकत मक्यापासून इथेनॉल केंद्रस्थानी

SCROLL FOR NEXT