Galyukta Shiwar Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Galyukta Shiwar Scheme : गाळ काढण्याचे काम वेगाने करा : जिल्हाधिकारी अरोरा

Maharashtra Agriculture Scheme: गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार हे अभियान येत्या १५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Akola News : गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार हे अभियान येत्या १५ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे. जल प्रकल्पातील साचलेला गाळ काढण्याचे काम वेगाने करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

दरम्यान, जिल्हा परिषदेमार्फत ६१ कामांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यात राबवावयाच्या गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला.

बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी राजेश गिरी, उपजिल्हा जलसंधारण अधिकारी डी.एस.खंदारकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एम. बी. काळे, मृद व जलसंधारण अधिकारी आर. एन. ठोके तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

उपजिल्हा जलसंधारण अधिकारी राजेश गिरी यांनी सांगितले, जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेकडून ६१ कामांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. ही कामे ग्रामपंचायतींकडून प्रस्तावित करण्यात आली आहेत.

या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन लवकरात लवकर कामे सुरू करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. प्रति ब्रास वाहतूक प्रणाली खर्च हा शासनाने भरावयाचा असून त्यासाठीही अंदाजपत्रकात तरतूद करावी, असेही त्यांनी सांगितले. अशासकीय संस्थांनी कामे वेगात पूर्ण करावी, असे निर्देशही दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT