Aadhaar E-KYC Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture E-KYC : खरिपातील मदतनिधीसाठी ई-केवायसी करा

E-KYC Update : शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Team Agrowon

Solapur News : मागील वर्षीच्या खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी मंजूर झाला आहे. त्याचे लवकरच वितरण करण्यात येणार आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

संबंधित तहसीलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी दिली आहे. तहसीलदारांनी शेतकऱ्यांची व्हिके लिस्ट ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध केली आहे. तसेच तहसीलदारांनी तालुक्यातील महसूल मंडल/तलाठी सजा/आपले सरकार केंद्राच्या ठिकाणी विशेष कॅम्पचे आयोजन केलेले आहे.

तरी ई-केवायसी (E-KYC) प्रलंबित शेतकऱ्यांनी यादीतील व्हिके नंबर घेऊन खालील ठिकाणी/तालुकास्तरीय महसूल मंडलांमध्ये जाऊन ई-केवायसी (E-KYC) प्रमाणिकरण करून घ्यावेत. त्यानंतरच मदतीची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.

संमतीपत्र, आधारलिंक हवे

ज्या शेतकऱ्यांचे त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रावर संयुक्त नाव आहे आणि त्यांचे नाव दुष्काळ यादीमध्ये समाविष्ट केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी संमतीपत्र तत्काळ तहसीलदार यांच्याकडे सादर करावे जेणेकरून त्यांना अनुदान देण्याची कार्यवाही करता येईल.

तसेच शासनामार्फत आतापर्यंत केलेल्या पेमेंटमध्ये आधारकार्ड बैंक खात्याशी लिंक नसणे, इनॲक्टिव्ह (Inactive) आधारकार्ड या कारणामुळे पेमेंट रिजेक्टेड (Rejected) झाले आहे. अशा शेतकऱ्यांनी बँकेमध्ये जाऊन त्यांचे आधार बँक खात्याशी लिंक करणे व आधार केंद्रावर जाऊन आधारकार्ड ॲक्टिव्ह (Active) करणे आवश्यक आहे, त्यानंतरच मदतीची रक्कम खात्यावर जमा होईल, असेही कुंभार म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT